Shubman Gill IPL 2023 Final : शुभमनला लवकर OUT करण्याच धोनीला टेन्शन, संजय मांजरेकरांनी दिली ‘आयडीया’

Shubman Gill IPL 2023 Final : शुभमन गिल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. एमएस धोनीकडे दोन ऑप्शन आहेत. त्यांचा अचूक वापर करुन धोनी शुभमन गिलला रोखू शकतो.

Shubman Gill IPL 2023 Final : शुभमनला लवकर OUT करण्याच धोनीला टेन्शन, संजय मांजरेकरांनी दिली 'आयडीया'
Shubhaman Gill IPL 2023 Image Credit source: ipl
Follow us
| Updated on: May 28, 2023 | 5:39 PM

अहमदाबाद : एमएस धोनी चेन्नई सुपर किंग्सच मुख्य बलस्थान आहे. धोनीच्या CSK ला आज 5 व्यां दा आयपीएल चॅम्पियन बनण्याची संधी आहे. चेन्नईकडे धोनी आहे, जो कधीही मॅच पलटू शकतो. त्याचवेळी गुजरात टायटन्सकडे शुभमन गिल आहे. हा प्लेयर धोनी आणि चेन्नईच्या अडचणी वाढवू शकतो. चेन्नई आणि गुजरातची टीम रविवारी आयपीएल 2023 च्या फायनलमध्ये आमने-सामने असेल. त्यावेळी सर्वांच्या नजरा गिलवर असतील.

शुभमन गिल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. 16 सामन्यात 3 शतक आणि 4 हाफ सेंच्युरीसह त्याने एकूण 851 धावा केल्या आहेत. मागच्या सामन्यातही मुंबई इंडियन्स विरुद्ध क्वालिफायर 2 च्या सामन्यात त्याने 60 चेंडूत 129 धावा फटकावल्या होत्या. गिल गुजरातची सर्वात मोठी ताकत आहे. त्यामुळे त्याला लवकर OUT करण्याचा चेन्नईचा प्रयत्न असेल. शुभमन गिलला धोनी लवकर कसा आऊट करु शकतो, त्याच उत्तर संजय मांजरेकर यांच्याकडे आहे.

गिलला बाद करण्यासाठी पावरप्लेमध्ये चेंडू कोणाकडे द्यावा?

गोलंदाजांची डोकेदुखी वाढवणाऱ्या शुभमन गिलला कसं आऊट करायच? ते संजय मांजरेकर यांनी सांगितलं. शुभमन गिल विरुद्ध एमएस धोनी दीपक चाहर आणि एका स्पिन बॉलरचा वापर करेल. गुजरातचा ओपनर शुभमन गिलला आऊट करण्यासाठी धोनीने पावरप्लेमध्ये दीपक चाहर आणि एका स्पिनरचा वापर केला पाहिजे. चाहरकडून गोलंदाजीची सुरवात करावी. गिलला CSK चा आणखी एक गोलंदाज आणेल अडचणीत

आतमध्ये येणारा चेंडू गिल बॅकफूटवर जाऊन खेळणार, असं संजय मांजरेकर यांना वाटतं. अशावेळी त्याला बाद करण्याची संधी मिळू शकते. महीश तीक्ष्णा सुद्धा चांगला पर्याय असल्याचे संजय मांजरेकरांनी सांगितलं. तीक्ष्णाच्या सरळ येणाऱ्या चेंडूवर गिल चुकला, तर चेन्नईला यश मिळू शकतं. चाहर गिलच्या अडचणी वाढवू शकतो. आयपीएलमध्ये दीपक चाहरने आतापर्यंत तीनवेळा शुभमन गिलला आऊट केलय. त्याच्याविरुद्ध गिलची सरासरी 20.66 आहे.

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.