IND vs AUS : टीम इंडियासाठी वाईट बातमी, WTC Final 2023 आधी समोर आला एक फोटो
IND vs AUS : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलआधी टीम इंडियाला निराश करणारी बातमी. हा फोटो टीम इंडियाची चिंता वाढवणारा आहे. भारताने 10 वर्षापूर्वी आयसीसी ट्रॉफी जिंकली होती.
लंडन : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलला आता अवघा एक दिवस उरला आहे. उद्यापासून इंग्लंडच्या द केनिंग्टन ओव्हल मैदानावर फायनलचा सामना रंगणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलआधी टीम इंडियासाठी एक वाईट बातमी आहे. फायनलआधी एक फोटोसमोर आलाय. हा फोटो टीम इंडियाची चिंता वाढवणारा आहे. भारताने 10 वर्षापूर्वी आयसीसी ट्रॉफी जिंकली होती.
टीम इंडियाला यंदा आयसीसी ट्रॉफीच्या जेतेपदाचा दुष्काळ संपवायचा आहे. त्यासाठी टीम इंडियाने कंबर कसली आहे. इंग्लंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळण्याची टीम इंडियाची दुसरी वेळ आहे.
फोटो सोशल मीडियावर शेअर
दरम्यान WTC 2023 च्या फायनलआधी द केनिंग्टन ओव्हलच्या पीचचा फोटो समोर आलाय. फायनलमध्ये या पीचमुळे टीम इंडियाच्या अडचणी वाढू शकतात. Espncricinfo ने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलआधी द केनिंग्टन ओव्हल पीचचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
22 yards for the #WTCFinal ? pic.twitter.com/bwBW9aln67
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 5, 2023
टीम इंडियासाठी कठीण काय?
या पीचवर भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळली जाणार आहे. पीचवर हिरवं गवत भरपून दिसतय. या हिरव्यागार पीचवर ऑस्ट्रेलियन गोलंदाज भारतीय फलंदाजांच्या अडचणी वाढवू शकतात. हिरवीगार खेळपट्टी गोलंदाजांच्या फायद्याची असते. इंग्लंडच्या थंडगार वातावरणात ड्यूक्सच्या स्विंग होणाऱ्या चेंडूंचा सामना करणं टीम इंडियासाठी सोपं नसेल.
This pitch will decide the fate of the WTC Final 2023 between India and Australia. As green as it can get. What do you make of it? A high scoring affair? #WTFFinal #Oval pic.twitter.com/7VgjgWFna5
— Ridhima Pathak (@PathakRidhima) June 5, 2023
वचपा काढण्याचा उद्देश
ऑस्ट्रेलियन टीमने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात भारत दौरा केला होता. टीम इंडियातील खेळपट्टया फिरकीला अनुकूल होत्या. या विकेटवर टीम इंडियाने टेस्ट सीरीज 2-1 ने जिंकली होती. आता ऑस्ट्रेलियन टीम या पराभवाचा वचपा काढण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. हिरव्यागार खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क भारतासाठी घातक ठरु शकतात. क्रिकेटच्या मैदानावर भारत-ऑस्ट्रेलिया आमने-सामने येतात, तेव्हा सामना फक्त, चेंडू आणि बॅट पर्यंत मर्यादीत राहत नाही, मैदानातील शाब्दीक संघर्षाची बरीच चर्चा होते. हे वादच दोन्ही देशामधील सामन्याची रंगत वाढवतात.