WTC Final 2023 : ऑस्ट्रेलियन टीमच्या मनात एका भारतीय बॉलरची दहशत, जोश हेझलवूडने दिली कुबली

WTC Final 2023 : बॅटिंगला अनुकूल असलेल्या पाटा विकेटवर टीम इंडियाचा हा गोलंदाज दिग्गजांना पुरुन उरलाय. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या मनात त्याची भिती निर्माण होणं स्वाभाविक आहे.

WTC Final 2023 : ऑस्ट्रेलियन टीमच्या मनात एका भारतीय बॉलरची दहशत, जोश हेझलवूडने दिली कुबली
ind vs aus wtc final 2023Image Credit source: AFP
Follow us
| Updated on: Jun 01, 2023 | 12:28 PM

लंडन : IPL 2023 चा सीजन संपलाय. आता सगळ्यांच लक्ष आहे ते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलवर. 7 जूनपासून लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर भारत-ऑस्ट्रेलियामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल रंगणार आहे. जी टीम ही फायनल जिंकेल, ती टेस्ट क्रिकेटमधील अव्वल टीम ठरेल. या सामन्यासाठी दोन्ही टीम्स जोरदार सराव करतायत. फायनलआधी ऑस्ट्रेलियन गोटात थोडं चिंतेच वातावरण आहे.

याच कारण आहे, भारताचा पेस बॉलिंग अटॅक. खासकरुन मोहम्मद सिराजने IPL 2023 मध्ये कमालीची गोलंदाजी केलीय. त्याच्या गोलंदाजीची चर्चा ऑस्ट्रेलियन गोटातही आहे.

जोश हेझलवूडने काय सांगितलं?

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने आयसीसी सोबत खास चर्चा केली. त्याने मोहम्मद सिराज कमालीचा फॉर्ममध्ये असून आग ओकणारी गोलंदाजी करतोय, असं सांगितलं. आरसीबी टीममध्ये थोडा उशिराने दाखल झालो, असं हेझलवूडने सांगितलं. मी सिराजची गोलंदाजी बघितलीय. तो चिन्नास्वामीच्या पाटा विकेट्सवरही जबरदस्त बॉलिगं करत होता. त्याशिवाय त्याचा इकॉनमी रेटही जबरदस्त होता. सिराजने जवळपास प्रत्येक सामन्यात पावरप्लेमध्ये आरसीबीला यश मिळवून दिलं.

टीम इंडियाचा हा गोलंदाज टेस्टमध्ये जास्त धोकादायक

मोहम्मद सिराजने आयपीएल 2023 मध्ये 14 सामन्यात 19 विकेट घेतल्या. सिराजने रेड बॉल क्रिकेट म्हणजे टेस्टमध्ये जास्त धोकादायक आहे. टेस्टमध्ये त्याच्या नावावर 47 विकेट्स आहेत. इंग्लंडमधील परिस्थिती मोहम्मद सिराजच्या जास्त फायद्याची आहे. त्याशिवाय दुसऱ्याबाजूला मोहम्मद शमी सुद्धा फॉर्ममध्ये आहे. शमीने 28 विकेट घेऊन पर्पल कॅप मिळवली. आता तो सिराजसोबत मिळून ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला खिंडार पाडण्यासाठी सज्ज आहे. टीम इंडियाचे तीन मोठे प्लेयर जबरदस्त फॉर्ममध्ये

टीम इंडिया याआधी सुद्धा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचली होती. त्यावेळी न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. यावेळी टीम इंडियाने कुठलीही कसूर ठेवलेली नाही. टीम इंडियाचे मोठे प्लेयर विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि शुभमन गिल जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. रहाणेला सुद्धा सूर सापडलाय. टीम इंडिया वर्ष 2013 नंतर पहिल्या आयसीसी विजेतेपदाच्या प्रतिक्षेत आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.