Axar patel देवदर्शनासाठी पोहोचला ‘या’ मंदिरात, 5 वर्षापासूनच स्वप्न झालं पूर्ण
Axar patel : अक्षर पटेल पत्नीसोबत पहाटे 4 वाजता मंदिरात दर्शनासाठी पोहोचला. भस्म आरती झाल्यानंतर दोघे लाइन लावून गर्भगृहात पोहोचले. 10 मिनिटात पूजा-अर्चना करुन भगवान शंकराचा आशिर्वाद घेतला.
Ujjain Mahakal Temple : मध्य प्रदेशातील उज्जैनचं महाकाल मंदिर प्रसिद्ध आहे. दररोज हजारो भाविक भगवान शंकराच्या दर्शनासाठी इथे येत असतात. महाकालच्या आशिर्वादाने मनातील इच्छा पूर्ण होतात. इंदोरमध्ये 1 मार्चपासून तिसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. त्याआधी टीम इंडियाचे खेळाडू उज्जैनच्या महाकाल मंदिरात जाऊन दर्शन घेत आहेत. केएल राहुलनंतर टीम इंडियाचा ऑलराऊंडर अक्षर पटेलने महाकाल मंदिरात पूजा-अर्चना केली. त्याने पत्नी मेहा पटेलसोबत भस्म आरती केली.
अक्षर पटेल पत्नीसोबत पहाटे 4 वाजता मंदिरात दर्शनासाठी पोहोचला. भस्म आरती झाल्यानंतर दोघे लाइन लावून गर्भगृहात पोहोचले. 10 मिनिटात पूजा-अर्चना करुन भगवान शंकराचा आशिर्वाद घेतला. मेहाने साडी नेसली होती. अक्षर पटेल धोती आणि सोला परिधान करुन दर्शनासाठी पोहोचला होता.
5 वर्षापूर्वीच स्वप्न पूर्ण
अक्षर पटेलच जानेवारी महिन्यात लग्न झालंय. लग्नानंतर ते पहिल्यांदा बाबा महाकाल दरबारात दर्शनासाठी पोहोचले. भस्म आरती आणि दर्शन घेतल्यानंतर अक्षर पटेलने 5 वर्षापूर्वीच स्वप्न पूर्ण झाल्याच सांगितलं. अक्षर पटेल याआधी सुद्धा बाबा महाकालच्या भस्म आरतीच दर्शन करण्यासाठी इंदूरला पोहोचला होता. पण त्यावेळी उशिर झाल्याने पहाटे 4 च्या सुमारास होणाऱ्या आरतीमध्ये तो सहभागी होऊ शकला नाही. त्याला सकाळी 7 वाजता होणाऱ्या आरतीमध्ये सहभागी व्हाव लागलं होतं.
Ujjain Indian cricketer Axar Patel along with wife Meha participated in Bhasma Aarti at Mahakal temple.@akshar2026 #aksharpatel #axarpatel #mahakal #अक्षरपटेल #महाकालेश्वर pic.twitter.com/OtFDDfIUtB
— Priyathosh Agnihamsa (@priyathosh6447) February 27, 2023
2 तास केला जप
माझी बऱ्याच वर्षांपासून भस्म आरती करण्याची इच्छा होती, असं अक्षरने सांगितलं. सोमवारीच बाबा महाकाल य़ांचा आशिर्वाद मिळाला, ते चांगलं झालं असं अक्षरने सांगितलं. अक्षर आणि त्याच्या पत्नीने महाकालच्या भस्म आरतीच दर्शन घेतल्यानंतर 2 तास ॐ नम: शिवायचा जप केला. अक्षरचा जलवा
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट सीरीजमध्ये अक्षर पटेल कमालीच प्रदर्शन करतोय. अक्षरने आतापर्यंत दोन्ही कसोटी विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिलय.. अक्षर पटेलने ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट सीरीजमध्ये फक्त एक विकेट काढला. पण त्याने बॅटने कमालीचा परफॉर्मन्स केला. टीम अडचणीत असताना अक्षर पटेल महत्त्वाच्या इनिंग खेळला. अक्षरने नागपूरमध्ये 84 आणि दिल्लीमध्ये 74 धावा करुन ऑस्ट्रेलियाचा पराभव निश्चित केला. आता इंदूरमध्येही त्याच्याकडून अशाच प्रदर्शनाची अपेक्षा आहे.