Prithvi Shaw controversy : सपना गिलच्या धमकीकडे दुर्लक्ष करुन पृथ्वीने उचललं पुढचं पाऊल

Prithvi Shaw controversy : इन्स्टाग्राम मॉडेल सपना गिल आणि तिच्या मित्रांसोबत पृथ्वीचा वाद झाला होता. शॉ आणि गिलमध्ये शाब्दीक वादावादीच पर्यावसन हाणामारीत झालं होतं. या प्रकरणात दोन्ही बाजूंनी पोलीस तक्रार दाखल झाली.

Prithvi Shaw controversy : सपना गिलच्या धमकीकडे दुर्लक्ष करुन पृथ्वीने उचललं पुढचं पाऊल
prithvi-sapnaImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Feb 26, 2023 | 2:11 PM

IPL 2023 : टीम इंडियाचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ सध्या वादात सापडला आहे. मुंबईतील एका हॉटेलबाहेर हाणामारी करतानाचा त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. इन्स्टाग्राम मॉडेल सपना गिल आणि तिच्या मित्रांसोबत पृथ्वीचा वाद झाला होता. शॉ आणि गिलमध्ये शाब्दीक वादावादीच पर्यावसन हाणामारीत झालं होतं. या प्रकरणात दोन्ही बाजूंनी पोलीस तक्रार दाखल झाली. सपना गिल आणि तिच्या मित्रांविरोधात पोलीस कारवाई करण्यात आली. पृथ्वीने आता हा वाद मागे सोडून पुढचं पाऊल टाकलं आहे.

पृथ्वी शॉ इडन गार्डन्सवर आयोजित करण्यात आलेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या सराव सत्रात सहभागी झाला होता. पुढील महिन्यात आयपीएल सीजनची सुरुवात होणार आहे. त्याआधी हे सराव सत्र आयोजित करण्यात आलं आहे.

बॅटिंगमध्ये आत्मविश्वास

कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर दिल्ली कॅपिटल्सकडून नेट सेशन आयोजित करण्यात आलं होतं. त्यावेळी पृथ्वी शॉ ने लक्ष वेधून घेतले. पृथ्वी आपल्या नेहमीच्या नैसर्गिक शैलीत आक्रमक बॅटिंग करताना दिसला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये पृथ्वी शॉ चांगल्या फॉर्ममध्ये आहे. नेट सेशनमध्ये त्याता क्लास दिसून आला. तो चांगल्या पद्धतीने बॉल टाइम करत होता. त्याच्या बॅटिंगमध्ये आत्मविश्वास दिसत होता.

प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली नाही

देशांतर्गत क्रिकेटमधील चांगल्या कामगिरीमुळे 23 वर्षीय पृथ्वी शॉ ला टीम इंडियात संधी मिळाली. न्यूझीलंड विरुद्ध मायदेशात टी 20 सीरीज झाली. भारतीय टीममध्ये पृथ्वीचा समावेश करण्यात आला. पण त्याला एकाही सामन्यात प्लेइंग 11 मध्ये संधी मिळू शकली नाही.

आयपीएलमध्ये त्याचा स्ट्राइक रेट खूपच प्रभावी

आयपीएलमध्येही पृथ्वी शॉ चा हा शानदार फॉर्म कायम राहिलं, अशी दिल्ली कॅपिटल्सला अपेक्षा आहे. दिल्ली कॅपिटल्सची टीम प्लेऑफमध्ये पोहोचलीय. पण कधी त्यांनी विजेतेपद मिळवलेलं नाही. या स्क्वॉडमध्ये वर्ल्ड क्रिकेटमधील काही चांगले प्लेयर्स आहेत. दिल्ली कॅपिटल्सला या सीजमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

शॉ दिल्ली कॅपिटल्सकडून ओपनिंगला येतो. आयपीएलमद्ये त्याचा स्ट्राइक रेट खूपच प्रभावी आहे. प्रतिस्पर्धी टीमच्या गोलंदाजीवर हल्लाबोल करण्याची क्षमता आहे. ज्यामुळे दिल्ली कॅपिटल्सला चांगली सुरुवात मिळू शकते. पृथ्वीला एक्सपोज करण्याचा इशारा

दरम्यान मुंबईच्या हॉटेल बाहेर झालेल्या वादाचा एक व्हिडीओ सपनाकडे आहे. या व्हिडीओत भांडणाचे भयंकर दृश्य कैद आहे. योग्यवेळी सपना गिल हा व्हिडीओ व्हायरल करणार असून पृथ्वीला एक्सपोज करणार आहे. तसा सूचक इशाराही तिने दिला आहे. त्यामुळे पृथ्वीच्या अडचणीत वाढ होऊ शकते असं सांगितलं जात आहे.

संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.