Arjun Tendulkar IPL 2023 : अर्जुन तेंडुलकरबाबत एक वाईट बातमी, LSG vs MI मॅचआधीची घटना, VIDEO
Arjun Tendulkar bites by Dog : लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्सच्या मॅचआधी अर्जुन तेंडुलकर बरोबर ही घटना घडली आहे. स्वत: अर्जुनने या बद्दल माहिती दिलीय. मुंबई इंडियन्ससाठी आजची मॅच महत्वाची आहे.
लखनौ : IPL 2023 मध्ये आज लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्समध्ये सामना होणार आहे. मात्र त्याआधी एक घटना घडलीय. मुंबई इंडियन्सचा बॉलर अर्जुन तेंडुलकरला कुत्रा चावला आहे. स्वत: अर्जुनने या बद्दल माहिती दिलीय. लखनौच्या इकाना स्टेडियमवर अर्जुन LSG च्या खेळाडूंना भेटत होता, त्यावेळी त्याने हा खुलासा केला. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सचा भाग आहे.
लखनौ सुपर जायंट्सने सोशल मीडियावर एका व्हिडिओ शेयर केलाय. त्यात अर्जुन तेंडुलकर LSG चे दोन प्लेयर्स युद्धवीर सिंह चरक आणि मोहसीन खानला भेटताना दिसतोय. या दरम्यान दोघांशी बोलताना त्याने कुत्रा चावल्याची माहिती दिली.
घाव किती गंभीर आहे?
कुत्रा अर्जुन तेंडुलकरला कधी चावला? या प्रश्नावर, त्याने एकदिवस आधी असं उत्तर दिलं. अर्जुनची विचारपूस केल्यानंतर युद्धवीर सिंह आणि मोहसीन खानने त्याला काळजी घेण्याचा सल्ला दिला. कुत्रा अर्जुनच्या डाव्या हाताला चावला. व्हिडिओमधून हे स्पष्ट होतं. कुत्रा चावल्याच निशाण त्याच्या हातावर आहे. पण घाव इतका गंभीर नाहीय. कारण दुखापत गंभीर असती, तर तो नेट्समध्ये गोलंदाजी करताना दिसला नसता.
Mumbai se aaya humara dost. ?? pic.twitter.com/6DlwSRKsNt
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) May 15, 2023
IPL 2023 मध्ये अर्जुन तेंडुलकरने किती विकेट घेतलेत?
अर्जुन तेंडुलकरला लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध संधी मिळणार की, नाही हे स्पष्ट नाहीय. त्याने चालू सीजनमध्ये कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध डेब्यु केला होता. डेब्युनंतर तो सलग चार सामने खेळला. त्यानंतर त्याला संधी मिळाली नाही. IPL 2023 मध्ये अर्जुन तेंडुलकर चार सामने खेळलाय. त्याने 3 विकेट घेतलेत. मुंबईसाठी आज मोठी मॅच
लखनौच्या इकाना स्टेडियमवर खेळला जाणारा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स दोन्ही टीम्ससाठी महत्वाचा आहे. हा सामना एलिमिनेटर नाही, पण या मॅचचा फिल तसाच असेल. कारण पराभूत संघासाठी प्लेऑफच्या अडचणी वाढणार आहेत. IPL 2023 मध्ये दोन्ही टीम्समधील हा पहिला सामना असणार आहे. या आधी मागच्या सीजनमध्ये दोन्ही टीम्स दोनवेळा आमने-सामने आल्या होत्या. त्यावेळी लखनौ सुपर जायंट्सने दोन्ही मॅच जिंकल्या होत्या. आज मुंबई इंडियन्स पराभवाची ही साखळी तोडणार का? त्याची उत्सुक्ता आहे.