IND vs AUS : फक्त WTC फायनलसाठी अजिंक्य रहाणेचा टीम इंडियात समावेश का? राहुल द्रविड यांचं मोठ स्टेटमेंट

Ajinkya Rahane Comeback: अजिंक्य रहाणेने टीम इंडियात कमबॅक केलय. जवळपास दीड वर्ष टीम बाहेर राहिल्यानंतर तो टीममध्ये परतलाय. एकवेळ अजिंक्य टीम इंडियाचा उपकर्णधार होता.

IND vs AUS : फक्त WTC फायनलसाठी अजिंक्य रहाणेचा टीम इंडियात समावेश का? राहुल द्रविड यांचं मोठ स्टेटमेंट
Rahul Dravid Image Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Jun 06, 2023 | 8:12 AM

लंडन : देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगलं प्रदर्शन केल्यामुळे अजिंक्य रहाणेला टीम इंडियात स्थान मिळालय. जवळपास दीड वर्षानंतर त्याने टीममध्ये कमबॅक केलय. येत्या 7 जूनपासून इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल रंगणार आहे. त्यासाठी अजिंक्य रहाणेचा टीममध्ये समावेश केलाय. एकवेळ अजिंक्य टीम इंडियाचा उपकर्णधार होता. पण खराब फॉर्ममुळे त्याला टीममधून वगळण्यात आलं. आता हेड कोच राहुल द्रविड यांनी अजिंक्य रहाणेला दिलासा देणार एक स्टेटमेंट केलय.

WTC फायनल ही अजिंक्यसाठी एकमेव संधी नाहीय, असं राहुल द्रविड यांनी म्हटलय. मुंबईचाच दुसरा खेळाडू श्रेयस अय्यरला दुखापत झाल्यामुळे अजिंक्य रहाणेला टीम इंडियात स्थान मिळालं. कसोटी संघात अय्यरने रहाणेची जागा घेतली होती.

रहाणे पुन्हा बाहेर जाणार का?

आयपीएलच्या आधी श्रेयस अय्यरला दुखापत झाली. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी निवडलेल्या टीममध्ये त्याची निवड केलेली नाही. त्याच्याजागी अजिंक्यला संधी मिळाली. श्रेयस अय्यर टीममध्ये परतल्यानंतर अजिंक्य रहाणे पुन्हा बाहेर जाणार का? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे.

राहुल द्रविड काय म्हणाले?

सोमवारी पत्रकार परिषदेत हेड कोच राहुल द्रविड यांनी अजिंक्य रहाणेबद्दल महत्वाच विधान केलं. “तुम्ही पुनरागमन केलय. तुम्ही चांगली कामगिरी केली, तर दीर्घकाळ टीममध्ये खेळू शकता” असं द्रविड म्हणाले. अप्रत्यक्षपणे राहुल द्रविड यांनी, अजिंक्य रहाणेची फक्त एका टेस्ट मॅचसाठी निवड झालेली नाही, हे स्पष्ट केलं. त्याने चांगली कामगिरी केली, तर आणखी संधी मिळू शकते. रहाणेच्या पुनरागमनाबद्दल राहुल द्रविड यांन आनंद व्यक्त केला. रहाणेच टीममध्ये असणं ही चांगली बाब आहे, असं द्रविड म्हणाले. त्याचं टीममध्ये असणं फायद्याच

अजिंक्यकडे बराच अनुभव आहे आणि त्याने स्वत:ला सिद्ध केलय असं राहुल द्रविड म्हणाले. “अजिंक्य इंग्लंडमध्ये काही शानदार इनिंग खेळलाय. स्लीपमध्ये तो शानदार फिल्डिंग करतो. रहाणेने टीमच नेतृत्व केलय. यश मिळवून दिलय. त्यामुळे त्याचं टीममध्ये असणं फायद्याच आहे” असं राहुल द्रविड म्हणाले.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.