WTC Final 2023 : ‘तुम्ही त्याचा IPL मधला फॉर्म….’ दिग्गज खेळाडूच रोहित शर्माबद्दल महत्वाच वक्तव्य

WTC Final 2023 : येत्या 7 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. रोहित शर्माची बॅट तळपली, तर ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढतील. अन्यथा टीम इंडियाची डोकेदुखी वाढेल.

WTC Final 2023 : 'तुम्ही त्याचा IPL मधला फॉर्म....' दिग्गज खेळाडूच रोहित शर्माबद्दल महत्वाच वक्तव्य
Rohit Sharma Image Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Jun 02, 2023 | 11:15 AM

लंडन : टीम इंडिया 7 जूनपासून पुन्हा एकदा Action मोडमध्ये दिसणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पहिल्यांदा WTC चॅम्पियनशिपचा किताब जिंकण्याचा प्रयत्न करेल. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडकडून पराभव झाला होता. दोन वर्षांपूर्वी 2021 मध्ये पहिल्यांदा टीम इंडियाच WTC फायनलमध्ये पोहोचली होती.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध फायनल खेळण्याआधी टीम इंडियासाठी रोहित शर्माचा फॉर्म हा चिंतेचा विषय आहे. रोहित शर्माची बॅट तळपली, तर ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढतील. अन्यथा टीम इंडियाची डोकेदुखी वाढेल.

IPL 2023 मध्ये रोहितची कामगिरी कशी आहे?

IPL 2023 च्या सीजनमध्ये रोहित शर्माच प्रदर्शन निराशाजनक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहोचली. पण रोहितचा परफॉर्मन्स प्रभावी नव्हता. त्याने 16 मॅचेसमध्ये 20.75 च्या सरासरीने 332 धावा केल्या. भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांच्या मते, टीम मॅनेजमेंटने रोहितच्या फॉर्मची चिंता करु नये. टेस्ट क्रिकेटमध्ये रोहित जास्त सहज आहे, असं मांजरेकर म्हणाले.

प्रसिद्ध किकेटर रोहित बद्दल काय म्हणाला?

“रोहित शर्माचा आयपीएल फॉर्म बाजूला ठेवा. मागच्या आयपीएल सीजनमध्येही रोहित शर्मा फॉर्ममध्ये नव्हता. पण ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात त्याने जबरदस्त बॅटिंग केल्याच आपण पाहिलं. रोहित शर्मा सध्या करीयरच्या ज्या टप्प्यावर आहे, तिथे विराट कोहलीसारखा टेस्ट क्रिकेटचा फॉर्मेट रोहितला जास्त उत्साहवर्धक वाटत असेल” असं संजय मांजरेकर म्हणाले.

टेस्टमध्ये रोहित कुठे चुकतो?

टेस्ट क्रिकेट खेळताना रोहित शर्मा बॅटिंगमध्ये फार चूका दिसत नाहीत. टेस्ट मॅचमध्ये फक्त एक समस्या दिसते. पुल शॉट खेळताना तो बऱ्याचदा आऊट झालाय. बॉलर्स रोहितला शॉर्ट पीच चेंडू टाकून फिल्डर तिथे ठेवतात. IPL 2022 मध्ये रोहितने किती धावा केल्या?

रोहित शर्माला आयपीएल 2022 मध्ये सुद्धा विशेष कामगिरी करता आली नव्हती. तिथे 14 सामन्यात त्याला 300 धावांचा टप्पा ओलांडता आला नव्हता. त्याने फक्त 268 धावा केल्या होत्या. 2019 च्या सीजनमध्ये रोहितने 400 प्लस धावा केल्या होत्या. त्यावेळी त्याने 15 सामन्यात 405 धावा केल्या होत्या.

चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.