IPL 2023 Final : reserve day च धोनीच्या लास्ट मॅचशी काय कनेक्शन? बिथरलेल्या CSK फॅन्सना आठवली ‘ती’ घटना

IPL 2023 Final reserve day : रिझर्व्ह डे ला होणाऱ्या फायनलला CSK चे फॅन्स धोनीशी निगडीत एका मोठ्या घटनेशी जोडत आहेत. सीएसकेच्या चाहत्यांनी याला 'देजा वू' म्हटलय. MS आज मॅच खेळण्यासाठी अखेरची वेळ मैदानात उतरणार का?

IPL 2023 Final : reserve day च धोनीच्या लास्ट मॅचशी काय कनेक्शन? बिथरलेल्या CSK फॅन्सना आठवली 'ती' घटना
एमएस धोनी सध्या गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त आहे. असं असतानाही तो क्रिकेट सामने खेळत आहे. आयपीएल संपल्यानंतर धोनीवर उपचार केले जातील. पण आज निवृत्ती जाहीर करून चेन्नईला विजयासह अलविदा करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
Follow us
| Updated on: May 29, 2023 | 8:49 AM

अहमदाबाद : IPL2023 च्या फायनल सामन्यावर काल पावसाने पाणी फिरवलं. त्यामुळे आज रिझर्व्ह डे च्या दिवशी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनल सामना रंगणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स हे दोन बलाढ्य संघ आमने-सामने आहेत. चेन्नई सुपर किंग्सने 4 वेळा आयपीएलच विजेतेपद पटकावल आहे. गुजरात टायटन्स दुसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन बनण्याचा प्रयत्न करेल. चेन्नईने क्वालिफायर-1 च्या सामन्यात गुजरात टायटन्सला नमवून फायनलमध्ये प्रवेश केला होता. गुजरात टायटन्सने क्वालिफायर-2 च्या सामन्यात मुंबई इंडियन्सला हरवलं.

काल 28 मे रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन टीम्समध्ये फायनल सामना खेळला जाणार होता. पण मॅच सुरु होण्याच्या तासभर आधी मुसळधार पाऊस सुरु झाला.

IPL च्या इतिहासात पहिल्यांदा असं घडतय

मॅच सुरु करण्यासाठी फिल्ड अंपायर्सनी रात्री 9.35 पर्यंत वाट पाहिली. पण पावसाचा जोर ओसरला नाही. त्यामुळे अखेर IPL च्या 16 व्या सीजनची फायनल रिझर्व्ह डे म्हणजे 29 मे रोजी खेळवण्याचा निर्णय जाहीर केला. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदा फायनल मॅच रिझर्व्ह डे च्या दिवशी होणार आहे.

CSK फॅन्सना ‘तो’ दिवस आठवला

सामना अधिकाऱ्यांनी रविवारच्या दिवसाचा खेळ निलंबित करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर CSK च्या फॅन्सना एमएस धोनीच्या शेवटच्या आंतरराष्ट्रीय सामन्याची आठवण झाली. 10 जुलै 2019 चा तो दिवस होता. टीम इंडिया आणि न्यूझीलंडध्ये वर्ल्ड कपच्या सेमीफायनलचा सामना सुरु होता. पण पावसामुळे अंपायर्सनी त्या दिवसाचा खेळ निलंबित करण्याचा निर्णय घेतला. वर्ल्ड कपची सेमीफायनल दुसऱ्या म्हणजे राखीव दिवशी खेळवण्याचा निर्णय झाला.

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याचा काय निकाल लागलेला?

एमएस धोनीने त्या मॅचमध्ये 72 चेंडूत 50 धावांची खेळी केली होती. टीम इंडियाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करताना, तो रनआऊट झाला होता. न्यूझीलंडने या मॅचमध्ये 18 धावांनी विजय मिळवून फायनलमध्ये प्रवेश केला होता. न्यूझीलंडच्या 239 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया 221 रन्सवर ऑलआऊट झाली होती.

कालची मॅच रद्द होण्याचा त्या मॅचशी काय संबंध?

हाच धोनीचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला होता. त्यानंतर धोनीने पुन्हा संधी मिळेल, म्हणून वाट पाहिली, पण निवड समितीने त्याचा विचार केला नाही. आता आयपीएलचा फायनल सामना नियोजित दिवशी रद्द झाला, त्या घटनेचा csk फॅन्स वर्ल्ड कप सेमीफायनलशी संबंध जोडत आहेत. कारण त्यानंतर धोनी पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिसला नाही. त्यामुळे आजचा गुजरातचा विरुद्धचा सामना धोनीची आयपीएलमधला शेवटचा सामना असेल का? अशी भिती चाहत्यांच्या मनात आहे. CSK चे फॅन्स याला ‘देजा वू’ म्हणतायत.

संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.