GT vs MI Qualifier 2 IPL 2023 : लोकांना चिरडलं, महिला अडकल्या, तिकीटांसाठी मारामार, चेंगराचेंगरी, VIDEO
GT vs MI Qualifier 2 IPL 2023 : गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्समधील दुसऱ्या क्वालिफायर सामन्याआधी चेंगराचेंगरीची स्थिती. बोर्डाकडून मोठी चूक झालीय. ज्याची किंमत लोकांना चुकवावी लागली. पाहा VIDEO
अहमदाबाद : IPL 2023 च्या सीजनमध्ये चॅम्पियन कोण बनणार? याचा निर्णय 28 मे च्या संध्याकाळी अहमदाबादमध्ये होईल. चेन्नई सुपर किंग्ससमोर फायनलमध्ये कुठली टीम असेल, त्याचा फैसला शुक्रवारी होईल. प्रत्येक जण फायनलची आतुरतेने वाट पाहतोय. बीसीसीआयने सुद्धा फायलनची तयारी सुरु केलीय. फायनलआधी आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज दुसरा क्वालिफायर सामना खेळला जाईल. मात्र या मॅचआधी बोर्डाकडून मोठी चूक झालीय. ज्याची किंमत लोकांना चुकवावी लागली.
बीसीसीआयच्या बेजबाबदारपणाचा फटका लोकांना सहन करावा लागला. बोर्डाच्या चुकीमुळे स्टेडियमबाहेर प्रचंड गर्दी झाली. कोणाची स्कुटी तुटली, तर पळापळ झाली. बीसीसीआयला आयपीएल 2023 फायनल तिकीटांची प्रोसेस मॅनेज करण्यात अपयश आलं. ज्यामुळे अहमदाबादच्या स्टेडियम बाहेर चेंगराचेंगरी झाली.
स्टेडियमबाहेर बरीच गर्दी
ऑफलाइन तिकीटांबाबत काही अधिकृत घोषणा झालेली नव्हती. ज्यांनी ऑनलाइन तिकीटस बुक केल्या होत्या, त्यांना काऊंटरवर जाऊन क्यूआर कोड दाखवायचे होते. तिकीटाची हार्ड कॉपी तिथेच मिळणार होती. तिकिट कलेक्शनसाठी सकाळी 11 ते संध्याकाळी 6 दरम्यान खिडकी उघडण्यात आली. ज्यासाठी स्टेडियमबाहेर बरीच गर्दी जमली होती.
पोलिसांना फॅन्सच्या या गर्दीला आवराव लागलं.
लोक एकमेकांच्या अंगावर चढून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. काही लोक या गर्दीत खाली पडले. पण दुसऱ्यांनी त्यांची पर्वा केली नाही. लोक पडलेल्या लोकांच्या अंगावर चढून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. या चेंगराचेंगरीत महिला सुद्धा फसल्या. स्टेडियम बाहेर घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
ऑफिशियल नोटिसनुसार, क्वालिफायर मॅचच्या दिवशी तिकीट्स दिल्या जाणार नाहीत. फॅन्स क्वालिफायर सामन्याच्या दुसऱ्यादिवशी तिकीट घेऊ शकतात.