WC closing ceremony | काय-काय असणार वर्ल्ड कपच्या क्लोजिंग सेरेमनीमध्ये? कुठले बॉलिवूड स्टार्स येणार?
WC closing ceremony | टीम इंडियाने दिमाखात वनडे वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. येत्या रविवारी 19 नोव्हेंबरला फायनलचा सामना रंगणार आहे. वर्ल्ड कपच्या फायनलआधी क्लोजिंग सेरेमनी होणार का? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. कारण वर्ल्ड कपचा शुभारंभ होताना ओपनिंग सेरेमनी झाली नव्हती.
अहमदाबाद : क्रिकेट वर्ल्ड कपच्या फायनलला आता फक्त दोन दिवस उरले आहेत. संपूर्ण देशात या वर्ल्ड कप फायनलबाबत मोठा उत्साह आहे. कारण टीम इंडियाने मोठ्या दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सर्वात मोठ्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये फायनलचा सामना रंगणार आहे. टीम इंडिया आणि पारंपारिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियामध्ये फायनला सामना रंगणार आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडला तर ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला हरवून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. फायनलच्या आधी क्लोजिंग सेरेमनी होणार का? हा अनेकांच्या मनात प्रश्न आहे. आयसीसी आणि बीसीसीआय या क्लोजिग सेरेमनीबद्दल मौन बाळगळून आहेत. पण नरेंद्र मोदी स्टेडियमवर क्लोजिंग सेरेमनची तयारी सुरु असल्याच दिसतय. स्टेडियममधल्या तयारीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बॉलिवूड स्टार्स या क्लोजिंग सेरेमनीमध्ये परफॉर्म करण्याची शक्यता आहे. इंडियन एअर फोर्सची सूर्य किरण टीमही आपलं हवाई कौशल्य सादर करणार आहे.
19 नोव्हेंबरला फायलनचा सामना सुरु होण्याआधी इंडियन एअर फोर्सची सूर्य किरण एरोबॅटिक टीम 10 मिनिटांचा एअर शो सादर करेल अशी गुजरातच्या डिफेन्स PRO ने माहिती दिलीय. शुक्रवारी आणि शनिवारी या एअर शो चा सराव करण्यात येईल. स्थानिक डान्स ग्रुपही स्टेडियम परिसरात नृत्याचा सराव करत आहेत. टीम इंडिया फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला भिडणार आहे. टीम इंडियाला 20 वर्षापूर्वीची हिशोब चुकता करण्याची संधी चालून आली आहे. 2003 मध्ये दक्षिण आफ्रिकेत वर्ल्ड कप झाला होता. त्यावेळी रिकी पॉन्टिंगच्या ऑस्ट्रेलियन संघाने फायनलमध्ये टीम इंडियावर विजय मिळवला होता. आता टीम इंडियाकडे त्या पराभवाची परतफेड करुन वर्ल्ड कप उंचावण्याची संधी आहे.
More exclusive footages from Narendra Modi Stadium, Ahmedabad.
Something is cooking for #CWC23 Finals 🤩✨#SAvsAUS #CricketTwitter #ViratKohli pic.twitter.com/evP4LFXMy0
— Ishan Joshi (@ishanjoshii) November 16, 2023
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
वनडे वर्ल्ड कप 2023 चा शुभारंभ याच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममधून झाला होता. पण त्यावेळी ओपनिंग सेरेमनी झाली नव्हती. त्याऐवजी 14 ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान सामन्याच्यावेळी मॅच आधी आणि सामन्याच्या मध्याावर कार्यक्रम झाला होता. वर्ल्ड कप 2023 च्या क्लोजिग सेरेमनीबद्दल अजूनपर्यंत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होतायत. त्यामध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवरुन दोन जेट उडताना दिसत आहेत.