VIDEO : कोण आहे हा? 12 चेंडूत 60 धावा, बॅटिंगचा झंझावात, ठोकलं तुफानी शतक
T20 लीगमध्ये एका बॅट्समनने जबरदस्त प्रहार केले. त्यामुळे प्रतिस्पर्धी टीमच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली. जणू त्यांच्यावर संकटांचा डोंगर कोसळलाय, असं वाटलं. त्यांच्या 10 रन्सवर 2 विकेट गेल्या होत्या. त्यावेळी मार्करमची मैदानात एंट्री झाली.
डरबन : एकापाठोपाठ एक 6 सिक्स, एकापाठोपाठ एक 6 फोर, काही कमी नाही, काही जास्त नाही. दक्षिण आफ्रिकेत T20 लीगमध्ये एका बॅट्समनने जबरदस्त प्रहार केले. त्यामुळे प्रतिस्पर्धी टीमच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली. जणू त्यांच्यावर संकटांचा डोंगर कोसळलाय, असं वाटलं. SA20 लीगच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये सनरायजर्स इस्टर्न कॅप आणि जोहान्सबर्ग सुपर किंग्समध्ये सामना झाला. या मॅचमध्ये सनरायजर्सकडून कॅप्टन एडन मार्करमने तुफानी शतक ठोकलं.
त्यावेळी मैदानात एंट्री झाली
या मॅचमध्ये सनरायजर्स इस्टर्न कॅपने पहिली बॅटिंग केली. त्यांच्या 10 रन्सवर 2 विकेट गेल्या होत्या. त्यावेळी मार्करमची मैदानात एंट्री झाली. क्रीजवर आल्यानंतर मार्करमने आधी पीच कशा प्रकारच आहे, ते समजून घेतलं. त्यानंतर तो सुरु झाला. T20 क्रिकेटमध्ये याआधी जे त्याने केलं नव्हतं, ते त्याने करुन दाखवलं. शतक ठोकताना त्याने T20 मध्ये आपली सर्वोच्च धावसंख्या नोंदवली.
Rising to the occasion when it matters most is the ???? of a great leader ?
The @SunrisersEC captain brings up a superb ? in the semi-final of #SA20 ⚡️#JSKvSEC #SA20onJioCinema #SA20onSports18 | @AidzMarkram pic.twitter.com/dggRQBCiNB
— JioCinema (@JioCinema) February 9, 2023
58 चेंडूत शतक
एडन मार्करमने 58 चेंडूत 100 धावा फटकावल्या. 79 मिनिटांच्या या धमाकेदार इनिंगमध्ये त्याने 6 सिक्स आणि 6 फोर मारले. चौकार-षटकार मोजले, तर मार्करमने 60 धावा फक्त 12 चेंडूत केल्या. त्याचं T20 क्रिकेटमधील हे पहिलं शतक आहे. त्यामुळे ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. टीमच्या विजयात तो चॅम्पियन
मार्करमच्या शतकाच्या बळावर सनरायजर्सने 20 ओव्हर्समध्ये 5 विकेट गमावून 213 धावा केल्या. प्रत्युत्तरात जोहान्सबर्ग सुपर किंग्सच्या टीमने 214 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण त्यांना 14 धावा कमी पडल्या. जोहान्सबर्ग सुपर किंग्सचा पराभव झाला. त्याचबरोबर या टीमचा SA20 लीगमधील प्रवास येथेच संपला.