Ajay Jadeja: वकारची गोलंदाजी फोडली, ‘त्या’ 45 धावांमुळे जाडेजा बनला देशाचा ‘हिरो’
भारतीय संघातील हँडसम, स्टायलिश आणि धडाकेबाद फलंदाजांमध्ये अजय जाडेजाची (Ajay jadeja) गणना होते. 1992-2000 अशी आठ वर्ष अजय जाडेजा भारतीय संघाचा (Indian Team) नियमित सदस्य होता.
भारतीय संघातील हँडसम, स्टायलिश आणि धडाकेबाद फलंदाजांमध्ये अजय जाडेजाची (Ajay jadeja) गणना होते. 1992-2000 अशी आठ वर्ष अजय जाडेजा भारतीय संघाचा (Indian Team) नियमित सदस्य होता. जाडेजा भारतासाठी 15 कसोटी आणि 196 एकदिवसीय सामने (ODI) खेळला. अजय जाडेजा उत्कृष्ट फिल्डरही होता. मॅच फिक्सिंग प्रकरणात अजय जाडेजाचं नाव आलं. पण आजही अजय जाडेजाचा विषय निघाला की, लोकांना आठवते ती त्याची स्फोटक फलंदाजी. अजय जाडेजाकडे कर्णधारपदाचेही गुण होते. त्याने काही सामन्यांमध्ये भारताचं कर्णधारपदही भूषवलं आहे. जाडेजा आक्रमक फलंदाजी करण्याची क्षमता होती. तो मधल्याफळीत फलंदाजीसाठी यायचा. जवळपास आठ वर्ष त्याने भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं. राजघराण्यातून आलेला जाडेजा त्याच्या लूकमुळे अनेक तरुणींचीही त्याला पसंती होती.
जन्म गुजरात जामनगरमध्ये एक फेब्रुवारी 1971 रोजी एका राजघराण्यात अजय जाडेजाचा जन्म झाला.
सुरुवातीचे दिवस आणि राजकुटुंब नवानगरच्या राजकुटुंबात अजय जाडेजाचा जन्म झाला. के.एस. रणजीतसिंहजी आणि के.एस. दुलीपसिंहजी हे अजय जाडेजाचे नातेवाईक होते. त्यांच्या नावाने आज देशातील प्रसिद्ध रणजी करंडक आणि दुलीप ट्रॉफी स्पर्धा खेळली जाते. अजय जाडेजाने सुद्धा आपल्या पूर्वजांच्या पावलावर पाऊल टाकून भारतीय संघात प्रवेश केला.
कसोटी पदार्पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नोव्हेंबर 1992 मध्ये डरबन येथे अजय जाडेजाने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. रवी शास्त्रीसोबत सलामीला आलेल्या अजय जाडेजाचा खेळपट्टीचा वेग आणि उसळीसमोर निभाव लागला नाही. तो अवघ्या तीन रन्सवर आऊट झाला.
वनडे पदार्पण ऑस्ट्रेलियात झालेल्या बेन्सन अँड हेजेस वर्ल्डकप स्पर्धेतून अजय जाडेजाने वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. वर्ल्डकपच्या नवव्या सामन्यात त्याने वनडेमध्ये पदार्पण केलं. या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. अजय जाडेजाच्या वनडे आणि कसोटी पदार्पणाच्या दोन्ही सामन्यांमध्ये पावसाचे व्यत्यय आणला होता.
वकार युनूसला धोपटलं 1996 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध उपांत्यफेरीत दाखवलेला खेळ अजय जाडेजा आणि समस्त भारतासाठी खास आहे. बंगळुरुच्या स्टेडिममध्ये वकार युनूसची गोलंदाजी जाडेजाने फोडून काढली होती. त्याने 25 चेंडूत 45 धावांची तडाखेबंद खेळी केली. त्यामुळे भारताला 50 षटकात 287 धावांपर्यंत मजल मारता आली. अजय जाडेजाने वकारची गोलंदाजीची बिघडवून टाकली. त्याच्या शेवटच्या दोन षटकात 40 धावा निघाल्या. त्या 45 धावा आजही अजय जाडेजाच्या सर्वोत्तम खेळीपैकी आहे.
वनडेची कॅप्टनशिप 1997 ते 2000 या काळात अजय जाडेजाने 13 वनडे सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केलं. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने आठ वनडे जिंकल्या तर पाचमध्ये पराभव झाला.
शेवटचा प्रथम श्रेणी सामना अजय जाडेजा प्रथम श्रेणीमधला शेवटचा सामना वयाच्या 42 व्या वर्षी नागपूरमध्ये विदर्भाविरुद्ध खेळला होता. हरयाणाचे कर्णधारपद भूषवताना जाडेजाने 33 आणि 7 धावा केल्या. विदर्भाने आठ विकेटने हरयाणाचा पराभव केला.
बॉलिवूड कनेक्शन अजय जाडेजाने 2003 मध्ये सनी देओल आणि सुनील शेट्टीसोबत खेल चित्रपटात काम केलं. त्यानंतर 2009 मध्ये पल पल दिल के सात या चित्रपटात दिसला.
मॅच फिक्सिंग स्कँडल अजय जाडेजाने क्रिकेटमध्ये भरपूर काही कमावलं. पण मॅच फिक्सिंगचा झालेला आरोप अजय जाडेजाच्या करीयरवर एक काळाडाग आहे. या आरोपामुळे महम्मद अझरुद्दीनला संघाचं कर्णधारपद सोडावं लागलं. हॅन्सी क्रोन्जे आणि हर्षल गिब्स या मॅच फिक्सिंगमध्ये गुंतले होते. अजय जाडेजावरही आरोप झाले होते. त्याच्यावरही पाच वर्षांची बंदी घालण्यात आली होती. या प्रकरणात अधिक चौकशी झाल्यानंतर अजय जाडेजावरील बंदी रद्द करण्यात आली. आरोपात तथ्य नाही हे स्पष्ट झाल्यानंतर जाडेजाला पुन्हा क्रिकेट खेळण्याची परवानगी देण्यात आली.
गोलंदाजीही करायचा अजय जाडेजा उत्तम फलंदाज होताच पण काही वेळा तो मध्यमगती गोलंदाजीही करायचा. शारजाला इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात त्याने एकाच षटकात तीन विकेट घेतल्या होत्या.
Ajay jadeja special innings against pakistan in 1996 world cup know 10 things about him