एजाज पटेलसाठी आर. अश्विनने ट्विटरकडे शब्द टाकला, चाहत्यांचाही पाठिंबा
न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने कसोटी सामन्याच्या एका डावात 10 गडी बाद करण्याची किमया केली. अशी कामगिरी करणारा एजाज हा जगातील तिसरा गोलंदाज ठरला. या विक्रमानंतर भारताचा फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने एजाजसाठी ट्विटरकडे एक मागणी केली आहे.
मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिका आज संपली आहे. उभय देशांमध्ये गेल्या आठवड्यात कानपूर येथे आणि आता मुंबई येथे असे दोन कसोटी सामने खेळवण्यात आले. कानपूरचा कसोटी सामना ड्रॉ झाला. मात्र मुंबई कसोटीत भारताने न्यूझीलंडवर 372 धावांनी विजय मिळवला. न्यूझीलंडने हा सामना गमावला असला तरी न्यूझीलंडच्या एका खेळाडूसाठी हा सामना ऐतिहासिक ठरला आहे. न्यूझीलंडच्या या गोलंदाजाने या सामन्यात विश्वविक्रमी कामगिरी केली. न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने कसोटी सामन्याच्या एका डावात 10 गडी बाद करण्याची किमया केली. अशी कामगिरी करणारा एजाज हा जगातील तिसरा गोलंदाज ठरला. या विक्रमानंतर भारताचा फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने एजाजसाठी ट्विटरकडे एक मागणी केली आहे. या मागणीला चाहत्यांनीदेखील पाठिंबा दर्शवला आहे. (Ajaz Patel deserves to be verify Twitter account, R. Ashwin’s Appeal ater perfect 10)
फिरकीपटू एजाज पटेल हा कसोटी क्रिकेटच्या एका डावात सर्वच्या सर्व 10 बळी घेणारा जगातील तिसरा आणि न्यूझीलंडचा पहिला गोलंदाज ठरला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात त्याने ही कामगिरी केली. त्याच्या आधी इंग्लंडचा जिम लेकर आणि भारताच्या अनिल कुंबळे या दोघांनी ही कामगिरी केली आहे. हे काम जिम लेकरने जुलै 1956 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध केले होते. त्याचवेळी कांबुळेने हा विक्रम फेब्रुवारी 1999 मध्ये दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केला होता. एजाजने या डावात 47.5 षटकं गोलंदाजी केली. यापैकी 12 षटकं त्याने निर्धाव टाकली आणि 119 धावा देत 10 बळी घेतले.
अश्विनची एजाजसाठी ट्विटरकडे मागणी
मुंबई कसोटी सामना संपल्यानंतर अश्विनने ट्विटरवरून एजाज पटेलसाठी खास मागणी केली. एजाजच्या ‘परफेक्ट 10’ नंतर अश्विनने ट्विटरकडे किवी गोलंदाजाचे ट्विटर अकाऊंट व्हेरिफाय करण्याची मागणी केली आहे. अश्विनने ट्विट करुन ही मागणी मांडली आहे. अश्विनने ट्विटमध्ये लिहिले आहे की, “डियर ट्विटर, एका डावात 10 विकेट्स घेतल्यानंतर एजाज निश्चितपणे व्हेरिफाईड अकाऊंटसाठी पात्र आहे.”
Verify म्हणजे ज्या अकाउंटच्या समोर ब्लू टिक आहे. एजाजचे ट्विटर अकाऊंट अद्याप व्हेरिफाय झालेलं नाही. अश्विनच्या या आवाहनाला चाहत्यांकडून खूप प्रेम आणि पाठिंबा मिळत आहे, चाहते या ट्विटला लाईक आणि कमेंट करुन आपला पाठिंबा दर्शवत आहेत.
Dear @verified , a ten wicket bag in an innings definitely deserves to be verified here! ? @AjazP
— Ashwin ?? (@ashwinravi99) December 6, 2021
‘मुंबईकर’ एजाज
एजाजला मुंबईबद्दल एक वेगळीच ओढ असल्याचे दिसते. त्यांचा जन्मही याच शहरात झाला आहे. एजाजचा जन्म 21 ऑक्टोबर 1988 रोजी मुंबईतच झाला होता. तो आठ वर्षांचा असताना त्याचे कुटुंब न्यूझीलंडला जाऊन स्थायिक झाले होते आणि तेव्हापासून ते या देशातील रहिवासी आहेत.
इतर बातम्या
IND vs NZ : टीम इंडियाकडून न्यूझीलंडचा वचपा, किवी संघाने हिरावलेलं पहिलं स्थान परत मिळवलं
ND vs NZ, 2nd Test : मयंकचं शतक, अश्विन-जयंतचे ‘चौकार’, मुंबई कसोटीत भारताचा 372 धावानी शानदार विजय
IND vs NZ : शुभमन गिलचा खणखणीत चौकार, वानखेडेवर ‘सचिन…सचिन…’चा जयघोष, पाहा नक्की काय झालं?
(Ajaz Patel deserves to be verify Twitter account, R. Ashwin’s Appeal ater perfect 10)