3 कोटी सॅलरी घेणारे 3 मोठे खेळाडू BCCI च्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून होणार OUT
त्याचवेळी 'या' तीन प्लेयर्सना मिळणार प्रमोशन, त्यांच्या सॅलरीत होणार घसघशीत वाढ.
मुंबई: जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड बीसीसीआय लवकरच आपल्या नव्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट सिस्टिमची घोषणा करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून तीन मोठे खेळाडू बाहेर होणार आहेत. 21 डिसेंबरला बीसीसीआयची बैठक होणार आहे. यावेळी अजिंक्य रहाणे आणि इशांत शर्मा या खेळाडूंना सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून ड्रॉप करण्याचा निर्णय होऊ शकतो. शुभमन गिल, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या या खेळाडूंना प्रमोशन मिळू शकते. रहाणे आणि इशांत शर्मा सेंट्रल कॉन्ट्रॅक्टच्या ग्रुप बीमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यांची वार्षिक सॅलरी प्रत्येकी 3 कोटी रुपये आहे.
एकूण चार कॅटेगरीत होते विभागणी
माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि वेगवान गोलंदाज इशांत शर्मा टीम इंडियात स्थान मिळवण्याच्या शर्यतीत सध्या कुठेच नाहीयत. त्यामुळे त्यांच सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट बाहेर होणं, जवळपास निश्चित आहे. पीटीआयने हे वृत्त दिलं आहे. विकेटकीपर फलंदाज ऋद्निमान साहाला सुद्धा यादीतून बाहेर केलं जाईल. त्याला वर्षाच्या सुरुवातीलाच तुझी टीम इंडियात पुन्हा निवड होणार नाही, याची कल्पना दिली होती. बीसीसीआय चार वर्गातमध्ये सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधील खेळाडूंची विभागणी करते. ए प्लस कॅटेगरीतील खेळाडूंना वर्षाला 7 कोटी रुपये, ग्रुप ए च्या खेळाडूंना 5 कोटी रुपये, ग्रुप बी मधील खेळाडूंना 3 कोटी रुपये आणि ग्रुप सी मधील खेळाडूंना वार्षिक 1 कोटी रुपये मिळतात.
प्रदर्शनाच्या आधारावर सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट
खेळाडूंची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी तसंच अन्य निकष तपासून सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये त्यांचा समावेश केला जातो. ए प्लस आणि ए अशी कॅटेगरी आहे, ज्यामधले खेळाडू नियमितपणे सर्व फॉर्मेटमध्ये खेळतात. ग्रुप बी मधील खेळाडू कमीत कमी दोन फॉर्मेटमध्ये खेळतात. ग्रुप सी मधील खेळाडू प्रामुख्याने एका फॉर्मेटमध्ये खेळतात.
‘या’ तीन खेळाडूंच होऊ शकतं प्रमोशन
बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये प्रमोशन प्रदर्शनाच्या आधारावर होतं. आयसीसी रँकिंगही यात लक्षात घेतली जाते. सूर्यकुमार यादव ग्रुप सी मध्ये आहे. मागच्या एक वर्षातील त्याची कामगिरी लक्षात घेऊन ग्रुप ए नाही, ग्रुप बी मध्ये प्रमोशनचा तो दावेदार आहे. आयसीसीच्या टी 20 रँकिंगमध्ये सूर्यकुमार टॉपवर आहे. शुभमन गिल आता नियमितपणे दोन फॉर्मेटमध्ये खेळतो. त्याचं ग्रुप सी मधून ग्रुप बी मध्ये प्रमोशन होऊ शकतं.
हार्दिक पंड्याच झालं होतं डिमोशन
इशान किशन वनडे आणि टी 20 दोन्ही फॉर्मेटमध्ये नियमितपणे खेळतोय. त्याचा सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये समावेश होणं जवळपास निश्चित आहे. पंड्याला मागच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये ग्रुप सी मध्ये डिमोट करण्यात आलं होतं. दुखापतीमुळे तो जास्त क्रिकेट खेळू शकला नव्हता. आता तो टी 20 टीमच्या कॅप्टनशिपचा दावेदार आहे. त्यामुळे त्याचा ग्रुप बी किंवा ए मध्ये समावेश होऊ शकतो.