SMAT : 8 सामने, 5 अर्धशतकं आणि 469 धावा, Ajinkya Rahane मॅन ऑफ द सीरिजचा मानकरी, पाहा व्हीडिओ

Ajinkya Rahane Player of the Tournament SMAT 2025 : मुंबईच्या अजिंक्य रहाणे याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत खोऱ्याने धावा केल्या. रहाणेचा त्याच्या या कामगिरीसाठी 'मॅन ऑफ द सीरिज'ने सन्मान करण्यात आला.

SMAT : 8 सामने, 5 अर्धशतकं आणि 469 धावा, Ajinkya Rahane मॅन ऑफ द सीरिजचा मानकरी, पाहा व्हीडिओ
Ajinkya Rahane wins Player of the Tournament smat
Follow us
| Updated on: Dec 15, 2024 | 9:46 PM

मुंबई क्रिकेट टीमने पुन्हा एकदा आपणच देशांतर्गत क्रिकेटमधील किंग असल्याचं सिद्ध करुन दाखवलं आहे. मुंबईने श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. मुंबईची सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकण्याची ही दुसरी वेळ ठरली. मुंबईने अंतिम फेरीत मध्य प्रदेशवर 5 विकेट्सने विजय मिळवला. मध्य प्रदेशने मुंबईसमोर विजयासाठी 175 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मुंबईने हे आव्हान 17.5 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं. मुंबईने 180 धावा केल्या. मुंबईसाठी श्रेयांश शेडगे आणि अथर्व अंकोलेकर या जोडीने निर्णायक क्षणी अनुक्रमे 36 आणि 16 अशा धावा केल्या. तर त्याआधी सूर्यकुमार यादव याने 48 तर अजिंक्य रहाणे याने 37 धावांची खेळी केली. अजिंक्य रहाणे याने या संपूर्ण स्पर्धेत उल्लेखनीय कामिगिरी. रहाणेने केलेल्या या कामगिरीसाठी त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ या पुरस्काराने गौरवण्यात आलं. रहाणेला 2 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.

रहाणेची कामगिरी

अजिंक्य रहाणे याने या स्पर्धेत वैयक्तिक खेळीचा आणि विक्रमांचा विचार न करता निर्भिड खेळी केली. रहाणेने मुंबईला विजयी करण्यात निर्णयाक भूमिका बजावली. रहाणेने या हंगामातील एकूण 8 सामन्यांमध्ये 469 धावा केल्या. रहाणेने या 8 डावांमध्ये एकूण तर सलग 3 अर्धशतकं झळकावली. रहाणे जपून खेळला असता तर त्याच्या नावावर 3 शतकंही असती. मात्र रहाणेने आधी सांगितल्याप्रमाणे वैयक्तिक विक्रमाच्या मोहात न पडता विजयाला प्राधान्य दिलं. रहाणेने यासह टीकाकारांनाही चोख उत्तर दिलं.

रहाणेच्या सामनेनिहाय धावा

  • विरुद्ध गोवा : 13 धावा
  • विरुद्ध महाराष्ट्र : 52 धावा
  • विरुद्ध केरळ : 68 धावा
  • विरुद्ध सर्व्हिसेस : 22 धावा
  • विरुद्ध आंध्रा : 95 धावा
  • विरुद्ध विदर्भ (क्वार्टर फायनल) : 84 धावा
  • विरुद्ध बडोदा (सेमी फायनल) : 98 धावा
  • विरुद्ध मध्य प्रदेश (फायनल) : 37 धावा

रहाणे प्लेअर ऑफ द सीरिज

मुंबई प्लेइंग इलेव्हन : श्रेयस अय्यर (कर्णधार), पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, तनुष कोटियन, रॉयस्टन डायस आणि अथर्व अंकोलेकर.

मध्य प्रदेश प्लेइंग इलेव्हन : रजत पाटीदार (कर्णधार), अर्पित गौड, हर्ष गवळी (विकेटकीपर), सुभ्रांशु सेनापती, हरप्रीत सिंग भाटिया, व्यंकटेश अय्यर, त्रिपुरेश सिंग, राहुल बाथम, शिवम शुक्ला, कुमार कार्तिकेय आणि आवेश खान.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.