Ajit Agarkar | Team India Chief Selector अजित आगरकर यांचा मार्ग सोपा नाही, समोर आहेत 5 मोठी चॅलेंज

Ajit Agarkar | BCCI च्या चीफ सिलेक्टर पदावर अजित आगरकर यांची वर्णी लागली आहे. आगरकर मूळचे मुंबईकर असून आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याचा मोठा अनुभव त्यांच्याकडे आहे. चीफ सिलेक्टर म्हणून अनेक आव्हान त्यांच्यासमोर असतील.

Ajit Agarkar | Team India Chief Selector अजित आगरकर यांचा मार्ग सोपा नाही, समोर आहेत 5 मोठी चॅलेंज
BCCI New chief selector Ajit agarkar
Follow us
| Updated on: Jul 05, 2023 | 7:55 AM

मुंबई : BCCI निवड समितीच अध्यक्षपद अखेर भरलं आहे. चेतन शर्मा यांच्या राजीनाम्यानंतर मागच्या काही महिन्यापासून हे पद रिक्त होते. काही दिवसांपासून बीसीसीआय निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी अजित आगरकर यांच्या नावाची चर्चा होती. अखेर त्यांचीच या पदावर वर्णी लागली आहे. अजित आगरकर भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य सिलेक्टर असतील. BCCI च्या क्रिकेट सल्लागार समितीने 4 जुलै रोजी आगारकर यांच्या नावाची घोषणा केली.

आगरकर याआधी IPL मधील दिल्ली कॅपिटल्स टीमसाठी काम करत होते. ते असिस्टेंट कोचच्या भूमिकेत होते. आता ते टीम इंडियाचे चीफ सिलेक्टर आहेत. या रोलमध्ये त्यांच्यावर जबाबदाऱ्या, आव्हान वेगळी असतील. सध्या आगारकर यांच्यासमोर 5 मुख्य आव्हान कुठली आहेत? त्या बद्दल जाणून घेऊया.

या प्रश्नाच उत्तर अजित आगरकर यांना शोधायचय

टीम इंडियाचा पुढचा कॅप्टन कोण असेल? हा टीम इंडियाच्या चीफ सिलेक्टरसमोर मुख्य प्रश्न असेल. रोहित शर्माच वय वाढत चाललय. त्याचा परिणाम त्याचा फिटनेस आणि फॉर्मवर दिसतोय. सध्या रोहित शर्मा टीम इंडियाचा कॅप्टन आहे. वर्ल्ड कपपर्यंत तो कर्णधारपदावर कायम राहील. रोहित शर्माच्या जागी कोण? या प्रश्नाच उत्तर अजित आगरकर यांना शोधाव लागेल.

वर्कलोड मॅनेजमेंट कसं करणार?

एक चांगली टीम बांधण्यासाठी आवश्यक आहे, खेळाडूंचे वर्कलोड मॅनेजमेंट. टीम इंडियाला पुढच्या काही महिन्यात अनेक मोठ्या सीरीज आणि टुर्नामेंट खेळायच्या आहेत. वर्कलोड मॅनेजमेंट कसं करणार? हे नव्या चीफ सिलेक्टरसमोर आव्हान आहे. वर्कलोड मॅनेज केल्यास एक चांगली आणि मजबूत टीमची बांधणी करता येईल. यावर्षी वनडे वर्ल्ड कप आहे तर पुढच्यावर्षी T20 वर्ल्ड कप आहे. यासाठी मजबूत टीमची निवड आणि ती निवडण्याच आव्हान अजित आगरकर यांच्यासमोर आहे. अजित आगरकर यांच्यासमोर सध्या कुठलं चॅलेंज?

टीम इंडियातील अनेक खेळाडू करिअरच्या अखेरच्या टप्प्यात आहेत. त्यामुळे आता लगेच नाही, पण वनडे वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाच बदल सुरु होतील. म्हणजे सिनियर खेळाडूंना बाजूला करुन त्यांच्याजागी युवा खेळाडूंची निवड केली जाईल. भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी हे सर्व बदल होतील. हे काम तडकाफडकी होणार नाही. याची एक प्रक्रिया असेल. त्याची रणनिती अजित आगरकर यांना ठरवावी लागेल. अजित आगरकर यांच्यासमोर आता आशिया कप आणि वनडे वर्ल्ड कपसाठी टीम निवडण्याच चॅलेंज आहे.

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.