Asia cup मध्ये कसं आहे सुपर 4 चं शेड्युल, IND vs PAK पुढचा सामना कधी? जाणून घ्या सर्व डिटेल्स

Asia cup 2022: आशिया कप (Asia cup) स्पर्धेत सुपर 4 ग्रुप मध्ये प्रवेश करणारी टीम इंडिया दुसरी टीम ठरली आहे. याआधी अफगाणिस्तानच्या टीमने सुपर 4 मध्ये प्रवेश केला.

Asia cup मध्ये कसं आहे सुपर 4 चं शेड्युल, IND vs PAK पुढचा सामना कधी? जाणून घ्या सर्व डिटेल्स
T20 World Cup 2022Image Credit source: icc
Follow us
| Updated on: Sep 01, 2022 | 12:34 PM

मुंबई: आशिया कप (Asia cup) स्पर्धेत सुपर 4 ग्रुप मध्ये प्रवेश करणारी टीम इंडिया दुसरी टीम ठरली आहे. याआधी अफगाणिस्तानच्या टीमने सुपर 4 मध्ये प्रवेश केला. दोन्ही संघांनी सलग दोन सामने जिंकले आहे. अफगाणिस्तानने (Afganistan) श्रीलंका आणि बांगलादेशवर विजय मिळवला. भारताने पाकिस्तान आणि हाँगकाँगला नमवलं. काल झालेल्या सामन्यात भारताने हाँगकाँगवर 40 धावांनी विजय मिळवला. आता पाकिस्तान आणि हाँगकाँगचा सामना बाकी आहे. पाकिस्तानने हाँगकाँगवर विजय मिळवला, तर चार सप्टेंबरला रविवारी पुन्हा भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामना होईल. हा सुपर 4 स्टेज मधील सामना असेल. याआधी मागच्यारविवारी भारताने पाकिस्तानवर पाच विकेट राखून मात केली. सुपर 4 स्टेज मधील भारताच्या सामन्यांबद्दल जाणून घ्या.

सुपर 4 मध्ये राऊंड रॉबिन सामने

आशिया कप स्पर्धेत दोन ग्रुप आहेत, ग्रुप ए आणि ग्रुप बी. ग्रुप ए मध्ये भारत, पाकिस्तान आणि हाँगकाँग हे संघ आहेत. ग्रुप बी मध्ये श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या टीम्स आहेत. प्रत्येक गुपमधील टॉप 2 टीम सुपर 4 साठी पात्र ठरतील. A1, A2 आणि B1, B2 या चार टीम्स सुपर 4 मध्ये असतील. सुपर 4 स्टेज मध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने सामने होतील. प्रत्येक संघ परस्पराविरुद्ध खेळेल.

आशिया कप मध्ये सुपर 4 चे सामने कधी आणि कुठे होतील?

आशिया कप मध्ये सुपर 4 स्टेज 3 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. शारजा क्रिकेट स्टेडियम आणि दुबई क्रिकेट स्टेडियम मध्ये हे सामने होणार आहेत.

भारत-पाकिस्तान मध्ये 3 सामने होणार?

ए ग्रुप मध्ये पाकिस्तान दुसऱ्या स्थानी राहिल्यास रविवारी 4 सप्टेंबरला भारताविरुद्ध सामना होईल. सुपर 4 राऊंड-रॉबिन मध्ये दोन्ही टीम्स टॉप 2 मध्ये राहिल्यास 11 सप्टेंबरला पुन्हा भारत-पाकिस्तान मध्ये फायनल होऊ शकते.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.