दुबई : आगामी इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPL 2022 मध्ये 8 नव्हे तर 10 संघ खेळणार असल्याचं यापूर्वीच समोर आलं होतं. त्यानुसार दोन नव्या संघांची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी लखनौ आणि अहमदाबाद या दोन संघाची एन्ट्री झाली आहे. या दोन संघासाठी अनेक दिग्गज व्यवसायिक आणि बड्या हस्तींमध्ये बोली लावण्यात आल्या आहेत. यापैकी अदानी ग्रुप, RPSG, हिंदुस्तान टाइम्स मीडिया, मँचेस्टर युनायटेड, रणवीर सिंग आणि अरुबिदों अशा काहींनी सर्वात महागड्या बोली लावल्या होत्या. (Amount spent for two new IPL teams shows why cricket is second most popular sport: Shane Warne)
RPSG अर्थात आरपी संजीव गोएन्का ग्रुप्स आणि सीवीसी कॅपिटल कंपनीने लिलाव जिंकला आहे. गोएन्का ग्रुपने लखनौचा संघ 7 हजार 90 कोटी रुपये तर सीवीसी कॅपिटल कंपनीने अहमदाबादचा संघ 5 हजार 625 कोटींना लिलावात विकत घेतला आहे.
दुबईमध्ये झालेल्या या लिलावात तब्बल 12 हजार कोटींच्या घरात दोन्ही संघ विकत घेण्यात आले आहेत. यावेळी अदानी ग्रुप, टॉरेंट आणि मँचेस्टर यूनाइटेडसारख्या बड्या कंपन्या आणि संघासह रणवीर सिंगसारखा अभिनेताही लिलाव प्रक्रियेत होता. यावेळी अदानी ग्रुप, टॉरेंट आणि मँचेस्टर यूनाइटेड यांची बोली 5000 कोटींपर्यंतच पोहचली. तर संजीव गोएन्का ग्रुपने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली लावत लखनौ संघ जवळपास 7 हजार 90 कोटी रुपयांना विकत घेतला आहे. तर सीवीसी कॅपिटलने अहमदाबाद संघाला जवळपास 5 हजार 625 कोटी रुपयांना लिलावात मिळवला आहे. त्यामुळे या दोन्ही संघासाठी मोजावी लागलेली किंमत तब्बल 12,600 कोटींहूनही अधिक आहे. या किंमती पाहून लोकांचे डोळे फिरले आहेत.
आयपीएलच्या दोन नव्या संघांची किंमत ऐकून माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू शेन वॉर्नचं डोकं चक्रावलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना माजी ऑस्ट्रेलियन फिरकीपटूला त्याच्या सर्वात मोठ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे, तो प्रश्न म्हणजे क्रिकेट हा जगातील दुसरा सर्वात लोकप्रिय खेळ का आहे? त्याने ट्विट केले आहे की, “जबरदस्त…दोन्ही संघांच्या मालकांना माझ्या शुभेच्छा. दोन्ही संघांसाठी मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करण्यात आला, यावरून क्रिकेट हा जगातील दुसरा सर्वात लोकप्रिय आणि सर्वात मोठा खेळ का आहे हे स्पष्ट होते. सौरव गांगुली, बीसीसीआय आणि आयपीएलशी संबंधित संपूर्ण टीमला माझ्या शुभेच्छा.”
Wow ! Congratulations to both of the new franchise owners. Staggering amounts of money for each team & shows why cricket has become the 2nd most popular & biggest sport on the planet. $932 & $692 million dollars (USA). Well done to @SGanguly99 & everyone at the @BCCI on the @IPL https://t.co/pFkhKqv9ln
— Shane Warne (@ShaneWarne) October 25, 2021
या लिलावापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने दोन्ही संघाची बेस प्राईज अर्थात सुरुवाती किंमत 2 हजार कोटी इतकी ठेवली होती. त्यानुसार सर्व उपस्थितांनी बोली लावण्यास सुरुवात केली. यावेळी अदानी ग्रुप, टॉरेंट आणि मँचेस्टर यूनाइटेड यांची बोली 5000 कोटींपर्यंतच पोहचली. तर संजीव गोएन्का ग्रुपने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली लावत लखनौ संघ जवळपास 7 हजार 90 कोटी रुपयांना तर सीवीसी कॅपिटल या प्रायव्हेट इक्वीटी फर्म अहमदाबाद संघ जवळपास 5 हजार 625 कोटी रुपयांना लिलावात मिळवला आहे. याआधी सर्वात महाग संघ म्हटलं तर पुणे वॉरियर्स हा होता ज्याला सहारा ग्रुपने 370 मिलियन डॉलर इतकी असून मुंबईचा संघही 111.9 मिलियन डॉलरच्या घरात आहे. पण या दोन्ही संघाची किंमत यांच्यापेक्षाही अधिक आहे.
इतर बातम्या
India vs Pakistan : भारताच्या पराभवानंतर विनोद कांबळी वैतागला, हार्दीकला म्हणतो जाऊन दांडीया खेळ
(Amount spent for two new IPL teams shows why cricket is second most popular sport: Shane Warne)