दोन खणखणीत षटकार, चिडलेल्या पाकिस्तानी बोलरने चेंडू फेकला, रसेल स्ट्रेचरवरुन रुग्णालयात
पाकिस्तान प्रिमियर लीगमधील ही घटना क्वेटा ग्लेडिएटर्स आणि इस्लामाबाद युनायटेड या संघाच्या सामन्या दरम्यान घडली. रसलच्या बाद होण्यामुळे त्याच्या संघाला मोठ्या पराभावाचा सामना करावा लागला.
अबु धाबी : वेस्ट इंडीज संघाचा स्फोटक फलंदाज आंद्रे रस्सेल (Andre Russell) पाकिस्तान सुपर लीगच्या (Pakistan Super League) पहिल्याच सामन्यात दुखापतग्रस्त झाला आहे. क्वेटा ग्लेडिएटर्स (Quetta Gladiators) संघाकडून खेळणाऱ्या रस्सेलला इस्लामाबाद युनायटेड (Islamabaad United) संघाच्या मोहम्मद मूसा या गोलंदाजाच्या चेंडूवर दुखापत झाली आहे. दुखापतीमुळे रस्सेल क्षेत्ररक्षणासाठी देखील येऊ शकला नाही. नसीम शाह याला त्याच्या जागी खेळवण्यात आले. ज्यामुळे त्याचा संघाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. (Andre Russell gets Injured After Hit by Pakistani Bowler Mohammed Mussa In Islamabad United vs Quetta Gladiators match at PSl)
सामन्यात क्वेटा ग्लेडिएटर्सची पहिली फलंदाजी होती. रस्सेल 14 व्या ओव्हरमध्ये बॅटिंग करत होता. त्यावेळी त्याने मोहम्मद मूसा या गोलंदाजाला सलग दोन षटकार खेचले. मात्र त्यानंतरच्याच स्लो बॉलचा अंदाज न आल्याने बॉल थेट रस्सेलच्या हॅल्मेटवर लागला. लगेचच रस्सेलला तपासण्यासाठी फिजीओ मैदानावर आला. मात्र त्यानंतरही रस्सेलने बॅटिंग केली खरी पण लगेचच पुढच्याच बॉलवर तो कॅचआउट झाला. डोक्याला लागल्यामुळे रस्सेलला मध्यांतरादरम्यान स्ट्रेचरवरुन तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. ज्यामुळे क्षेत्ररक्षणावेळी रस्सेलच्या जागी नसीम शाह याला खेळवण्यात आले.
कसा झाला सामना?
क्वेटा ग्लेडिएटर्स आणि इस्लामाबाद युनायटेड यांच्यातील सामन्यात क्वेटा संघाने प्रथम फलंदाजी करत केवळ 133 धावा केल्या. जे. वेदरलर्ड (J Weatherald) याच्या 43 धावांच्या जोरावर क्वेटा संघाने ही धावसंख्या उभी केली. ज्यानंतर गोलंदाजीवेळीतर क्वेटा संघाच्या गोलंदाजाना एखही विकेट घेता आली नाही. ज्यामुळे इस्लामाबादच्या सलामीवीरांनी एकहाती सामना इस्लामाबादला जिंकवून दिला. ज्यात उस्मान ख्वाजाने (UT Khawaja) 40 नाबाद तर सी मुन्रो याने (C Munro) 90 नाबाद धावा केल्या.
हे ही वाचा :
Video : Live सामन्यात शाकिब अल हसनला राग अनावर, अंपायरवर भडकून थेट स्टंपलाच मारली लाथ
IND vs SL : भारताचा श्रीलंका दौरा, सलामीला कोण उतरणार?, मधल्या फळीत कुणाला संधी? पाहा…
(Andre Russell gets Injured After Hit by Pakistani Bowler Mohammed Mussa In Islamabad United vs Quetta Gladiators match at PSl)