रसेल-नरेनची घमेंड मोडली, शेवटच्या चेंडूवर SIX मारला, पण….
दोघांची घमेंड मोडलीच. पण रसेल-नरेनच्या बालिश चुकीचा टीमला असा बसला फटका.
मुंबई: आंद्रे रसेल आणि सुनील नरेन ही वेस्ट इंडिज क्रिकेटमधली मोठी नावं. दोघेही आक्रमक फलंदाज. एकहाती सामना फिरवण्याची क्षमता असलेले हे खेळाडू. हे दोघे विकेटवर असताना मैदानात चौकार-षटकारांचा पाऊस पडतो. कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये दोघे लास्ट ओव्हरपर्यंत क्रीजवर होते. मात्र, तरीही टीमचा पराभव झाला. ट्रिनबॅगो नाइट रायडर्सचा सेंट लुसिया किंग्सकडून अवघ्या 1 रन्सने पराभव झाला.
सीपीएलमधील ही 23 वी मॅच होती. सेंट लुसिया किंग्सने अवघ्या 147 धावा केल्या होत्या. पण ट्रिनबॅगो नाइट रायडर्सला हा सामना जिंकता आला नाही. रसेल आणि नरेनमधील रनिंग बिटविन द विकेट या पराभवाला कारण आहे.
सेंट लुसियाचा रोमांचक विजय
या मॅचमध्ये सेंट लुसियाचा विजय निश्चित वाटत होता. ट्रिनबॅगो नाइट रायडर्सला लास्ट ओव्हरमध्ये विजयासाठी 21 धावांची आवश्यकता होती. रोशन प्राइमसच्या हातात चेंडू होता. त्याने पहिल्या तीन चेंडूत फक्त 4 धावा दिल्या. शेवटच्या 3 चेंडूत ट्रिनबॅगोला विजयासाठी 18 धावांची आवश्यकता होती.
शेवटच्या चेंडूवर षटकार खेचला, पण
प्राइमसच्या चौथ्या चेंडूवर रसेलने चौकार मारला. पाचव्या चेंडूवर रसेलने सिक्स मारला. शेवटच्या चेंडूवर ट्रिनबॅगोला 7 धावांची गरज होती. रसेलने सिक्स मारला. हा षटकार मारुनही ट्रिनबॅगोची टीम 1 रन्सने हरली.
मग टीम कशी हरली?
तुम्ही म्हणाला रसेल इतकी चांगली फलंदाजी केली, मग टीम कशी हरली? खरंतर रसेल आणि नरेनची रनिंग बिटविन द विकेट खूपच खराब होती. दोघांनी पळून 2-2 धावा काढण्याची संधी वाया दवडली. अखेर टीमला त्याची किंमत एक रन्सच्या पराभवाने चुकवावी लागली.