Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Andrew Symonds death: ‘जेवणा बरोबर हेडनच्या बायकोकडे पण पाहता येतं’, अँड्र्यू सायमन्ड्सचं भुवया उंचावणारं ते विधान

Andrew Symonds death: क्रीडा क्षेत्रात अनेक खेळाडू गुणवान असतात. पण नम्रतेचा भाव फार कमी जणांकडे असतो. ब्रेट ली (Bret lee) आणि अँड्र्यू सायमन्ड्स (Andrew Symonds) या दोन नावांमधून फरक तुमच्या लगेच लक्षात येईल.

Andrew Symonds death: 'जेवणा बरोबर हेडनच्या बायकोकडे पण पाहता येतं', अँड्र्यू सायमन्ड्सचं भुवया उंचावणारं ते विधान
Andrew symonds-Matthew hayden with wife Image Credit source: Facebook
Follow us
| Updated on: May 18, 2022 | 9:38 PM

मुंबई: टॅलेंट बरोबर नम्रता, समजूतदारपणा आवश्यक असतो. कारण या दोन गोष्टी तुमच्याकडे असतील, तर तुम्ही व्यक्ती म्हणून मोठे होता. क्रीडा क्षेत्रात अनेक खेळाडू गुणवान असतात. पण नम्रतेचा भाव फार कमी जणांकडे असतो. ब्रेट ली (Bret lee) आणि अँड्र्यू सायमन्ड्स (Andrew Symonds) या दोन नावांमधून फरक तुमच्या लगेच लक्षात येईल. अँड्र्यू सायमन्ड्स ब्रेट ली इतकाच प्रतिभावान क्रिकेटपटू. पण तो नेहमीच वेगवेगळ्या विधानांमुळे चर्चेत राहिला.  कुठल्याही क्षेत्रात काम करताना, अ‍ॅटिट्यूड खूप महत्त्वाचा असतो. फक्त तो अ‍ॅटिट्यूड अहंकार, हट्टीपणाकडे झुकणारा नसावा. सायमन्ड्सच्या बाबतीत नेमकं हेच झालं. फक्त एक उत्तम क्रिकेटपटू (Cricketer) म्हणून तो लक्षात रहायला पाहिजे होता. पण तो क्रिकेटच्या बरोबरीने त्याने केलेल्या विधानांसाठी लक्षात राहतो. मागच्या शनिवारीच अँड्र्यू सायमन्ड्सचं कार अपघातात निधन झालं. वयाच्या अवघ्या 46 व्या वर्षी सायमन्ड्सने जगाचा निरोप घेतला. त्याच्या निधनाची बातमी अनेकांना चटका लावून गेली. सायमन्डसची धिप्पाड शरीर यष्टी, ओठांवरच क्रीम, त्याचे केस सगळचं डोळ्यासमोर आलं. सायमन्डस तीन वादांसाठी कायम लक्षात राहिलं.

मंकी गेट प्रकरण

2007-08 साली भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. सिडनीत सीरीजमधील दुसरा कसोटी सामना सुरु होता. यजमान संघाने म्हणजे ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला होता. सामन्यादरम्यान हरभजन आणि सायमंड्स मध्ये वादावादी झाली होती. सामन्यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पॉन्टिंगने सामनाधिकाऱ्यांकडे हरभजन विरोधात तक्रार केली होती. हरभजनने वर्णद्वेशी टिप्पणी केल्याचा आरोप केला होता. हरभजनने सायमंड्सला माकड म्हटल्याचं पॉन्टिंगने आरोप केला होता.

हेडनच्या पत्नीबद्दलचं ते विधान

मॅथ्यू हेडन आणि अँड्र्यू सायमन्ड्स दोघे परस्परांचे चांगले मित्र. ऑस्ट्रेलियन संघातून एकत्र खेळताना त्यांच्यात चांगली गट्टी जमली. सायमन्ड्स आणि हेडन दोघांना मासेमारीची आवड होती. अनेकदा दोघे एकत्र समुद्रात मासेमारीसाठी जायचे. सायमन्ड्सच हेडनच्या घरी सुद्धा येण-जाणं असायचं. एकदा एका मुलाखतीत सायमन्ड्सला या बद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने दिलेलं उत्तर आजही लक्षात आहे. मी हेडनकडे जेवायला जातो. कारण त्या निमित्ताने मला त्याच्या पत्नीला केलीला पाहता येतं, असं विधान सायमन्ड्सने केलं होतं. सायमन्ड्सच्या त्या विधानावरुन काही जणांनी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण हेडन आणि सायमन्ड्सची मैत्रीच तशी होती. त्यांच्या नात्यात परस्पराबद्दल आदर, विश्वासाची भावना होती. त्यामुळे सायमन्ड्स इतक्या मोकळेपणाने ते विधान करु शकला.

कोण आहे हेडनची पत्नी केली?

सायमन्ड्सने मुलाखतीत मॅथ्यू हेडनची पत्नी केलीचा उल्लेख केला होता. हेडनच्या घरी गेल्यावर जेवणाच्या निमित्ताने तिला पाहता येत असं सायमन्ड्सने म्हटलं होतं. ही केली हेडन एक गृहिणी आहे. हेडनचा केली बरोबर सुखाने संसार सुरु आहे. या जोडप्याला तीन मुलं आहेत. जोशुआ आणि थॉमस अशी हेडनच्या दोन मुलांची नाव आहेत. त्यांना मुलगी असून तिचं नाव ग्रेस आहे. मॅथ्यू हेडनचे अँड्रयू सायमन्डस बरोबर कौटुंबिक संबंध होते.

चाहत्याला केली मारहाण

सायमन्ड्स मैदानावर जितका आक्रमक असायचा. मैदानाबाहेरही तो तसाच होता. क्रिकेट चाहत्यांना अनेकदा आपल्या लाडक्या क्रिकेटपटूंना भेटण्याची इच्छा असते. 2008 मध्ये एका चाहत्याला सायमन्ड्सची गळाभेट घ्यायची होती. पण सायमन्ड्सने त्याला मारहाण केली. याचे पुरावे मिळाले नाही. त्यामुळे सायमन्ड्स वाचला.

सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल.
'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?
'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?.
एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका
एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका.
विधिमंडळाच्या समितीत भुजबळ अन् मुंडेंना स्थान नाही, दादांनी का डावललं?
विधिमंडळाच्या समितीत भुजबळ अन् मुंडेंना स्थान नाही, दादांनी का डावललं?.
'हीच ती वेळ... एका पराभवाने खचणार नाही', शरद पवारांचं मोठं वक्तव्य
'हीच ती वेळ... एका पराभवाने खचणार नाही', शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
लंडनच्या मित्राचा फोन अन् दिशाने सगळंच संपवलं..
लंडनच्या मित्राचा फोन अन् दिशाने सगळंच संपवलं...
त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली
त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली.
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात.
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब.
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.