टी20 वर्ल्डकप जिंकताच भारताच्या जर्सीत होणार असा बदल, काय ते जाणून घ्या

टी20 वर्ल्डकप जेतेपदापासून टीम इंडिया एक पाऊल दूर आहे. या स्पर्धेत टीम इंडियाच बाजी मारणार असा विश्वास क्रीडाप्रेमींना आहे. टीम इंडियाने टी20 वर्ल्डकप स्पर्धेवर नाव कोरताच जर्सीत महत्त्वाचा बदल होणार आहे. काय ते जाणून घ्या.

टी20 वर्ल्डकप जिंकताच भारताच्या जर्सीत होणार असा बदल, काय ते जाणून घ्या
Follow us
| Updated on: Jun 29, 2024 | 4:32 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतीन नव्या विजेत्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात अंतिम फेरीचा सामना होणार आहे. दोन्ही संघांनी जेतेपदासाठी कंबर कसली आहे. आतापर्यंत दोन्ही संघांचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास एकही सामना न गमवता झाला आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा जेतेपदासाठी प्रबळ दावा आहे. असं असलं तरी भारतीय संघाची बाजू भक्कम दिसत आहे. भारतीय संघच जेतेपदावर नाव कोरेल असा विश्वास क्रीडाप्रेमींना आहे. असं असताना भारताने टी20 वर्ल्डकप जिंकताच भारतीय संघाच्या जर्सीत एक महत्वाचा बदल होणार आहे. भारताच्या टी20 वर्ल्डकप जर्सीवर एक स्टार आहे. हा स्टार 2007 टी20 वर्ल्डकप जेतेपदाचा आहे. आता यात आणखी एका स्टार्सची भर पडणार आहे. म्हणजेच हा वर्ल्डकप जिंकला तर भारतीय टी20 जर्सीवर दोन स्टार दिसतील. बीसीसीआय लोगोच्या वर सध्या एक स्टार दिसत आहे. आता विजयानंतर दोन स्टार दिसतील.

योगायोग म्हणजे भारताने 2007 साली पहिला टी20 वर्ल्डकप दक्षिण अफ्रिकेत जिंकला होता. त्यानंतर गेली 17 वर्षे भारताची जेतेपदाची झोळी रितीच आहे. आता पुन्हा एकदा भारतीय संघाला संधी चालून आली आहे. इतकंच काय तर समोर संघ आहे दक्षिण अफ्रिकेचा…2007 साली दक्षिण अफ्रिकेत वर्ल्डकप जिंकलो. आता 2024 साली दक्षिण अफ्रिकेविरुद्ध विजयी होणार असा विश्वास क्रीडाप्रेमींना आहे. त्यामुळे आता भारतीय संघाच्या जर्सीवर दोन स्टार लागतात की दक्षिण अफ्रिकेच्या जर्सीवर एक स्टार लागतो हे पाहणं औत्सुक्याचं आहे.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

भारत : विराट कोहली, रोहित शर्मा (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यराम यादव, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल , कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह.

दक्षिण अफ्रिका : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे , तबरेझ शम्सी.

दोन्ही संघाचे खेळाडू

दक्षिण अफ्रिका : एडेन मार्कराम (कर्णधार) , ओटनील बार्टमन , गेराल्ड कोएत्झी , क्विंटन डी कॉक (विकेटकीपर) , ब्योर्न फॉर्च्युइन , रीझा हेंड्रिक्स , मार्को जॅन्सेन , हेनरिक क्लासेन , केशव महाराज , डेव्हिड मिलर , ॲनरिक नॉर्टजे , कागिसो रबाडा , सेंट ट्रायब्स्स्टन , ट्रायब्स्स्टन , रियान टॅब्सी.

भारत : रोहित शर्मा (कर्णधार) , हार्दिक पंड्या , यशस्वी जयस्वाल , विराट कोहली , सूर्यकुमार यादव , ऋषभ पंत , संजू सॅमसन , शिवम दुबे , रवींद्र जडेजा , अक्षर पटेल , कुलदीप यादव , युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंह , जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

Non Stop LIVE Update
विधानपरिषदेत शिवीगाळ, भर सभागृहात दानवेंनी कोणाला वापरली अर्वाच्य भाषा
विधानपरिषदेत शिवीगाळ, भर सभागृहात दानवेंनी कोणाला वापरली अर्वाच्य भाषा.
मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब vs किरण शेलारांमध्ये लढत, आघाडीवर कोण
मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब vs किरण शेलारांमध्ये लढत, आघाडीवर कोण.
नाहीतर भिडेंच्या मिशा कापणार, 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून कुणी घेरल?
नाहीतर भिडेंच्या मिशा कापणार, 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून कुणी घेरल?.
विधान परिषदेसाठी भाजपकडून ही 5 नावं जाहीर, मुंडेंसह कोणाची लागली वर्णी
विधान परिषदेसाठी भाजपकडून ही 5 नावं जाहीर, मुंडेंसह कोणाची लागली वर्णी.
पंकजा मुंडेंचं भाजपकडून पुनर्वसन, विधान परिषदेची उमेदवारी मिळाली
पंकजा मुंडेंचं भाजपकडून पुनर्वसन, विधान परिषदेची उमेदवारी मिळाली.
हे काय मॅच जिंकणार! विधानसभेत त्यांच्या...'त्या' दाव्यावर कुणाचा टोला?
हे काय मॅच जिंकणार! विधानसभेत त्यांच्या...'त्या' दाव्यावर कुणाचा टोला?.
आम्ही 13 जुलैपर्यंतच वाट बघणार, त्यानंतर...जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम
आम्ही 13 जुलैपर्यंतच वाट बघणार, त्यानंतर...जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम.
मनोज जरांगे साहेब, जरा शब्दांना...शिंदे गटाच्या महिला नेत्यानं सुनावलं
मनोज जरांगे साहेब, जरा शब्दांना...शिंदे गटाच्या महिला नेत्यानं सुनावलं.
कुटुंबातील 17 जण पिकनीकला, भावाचा फोन अन् घाबरतच म्हणाला, मुलगी वाहून
कुटुंबातील 17 जण पिकनीकला, भावाचा फोन अन् घाबरतच म्हणाला, मुलगी वाहून.
सत्तेची वारी शेवटची..माझी लाडकी बहीण योजनेवरून सामनातून दादांवर निशाणा
सत्तेची वारी शेवटची..माझी लाडकी बहीण योजनेवरून सामनातून दादांवर निशाणा.