Virat Kohli Resigns: विराटच्या राजीनाम्यावर अनुष्काची भावनिक पोस्ट, तुला कशाचाही हव्यास नव्हता, अगदी कर्णधारपदाचादेखील नाही…
बीसीसीआय, चाहते आणि सहकाऱ्यांनंतर आता कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मानेही तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक लांबलचक पोस्ट लिहून विराट कोहलीच्या योगदानाचे कौतुक केले आहे.
1 / 7
विराट कोहलीने भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यापासून सर्वांनाच धक्का बसला आहे. मात्र आता हा धक्का विसरुन त्याचे सहकारी, मित्र त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत. बीसीसीआय, चाहते आणि सहकाऱ्यांनंतर आता कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मानेही तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक लांबलचक पोस्ट लिहून कोहलीच्या योगदानाचे कौतुक केले आहे.
2 / 7
अनुष्काने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केलीय. यामध्ये विराट कर्णधार झाल्यापासून आतापर्यंतच्या त्याच्या प्रवासात त्याने मिळवललेलं यश, आव्हान आणि अपयश या बद्दल अनुष्काने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अनुष्काने म्हटलं आहे की “2014 मधला मला तो दिवस लक्षात आहे, जेव्हा कर्णधार म्हणून तुझी निवड झाल्याचं तू मला सांगितलं होतंस.एमएस धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. मला लक्षात आहे, एमएस, तू आणि मी नंतर चॅटिंग करत होतो. त्यावेळी तो मस्करी मध्ये म्हणाला होता, विराटची दाढी आता लवकरच सफेद होईल. आपण सगळेच त्यावर हसलो होतो. त्यादिवसापासून तुझी दाढी सफेद होण्याबरोबरच मी बरंच काही पाहिलं आहे.”
3 / 7
अनुष्काने पुढे लिहिलं आहे की, “मी तुला पुढे जाताना पाहिलं. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून तू जी प्रगती केलीस आणि तुझ्या नेतृत्वाखाली संघाने जे यश मिळवलं, याचा मला अभिमान आहेच. पण तू स्वत:मध्ये जी प्रगती केलीस, त्याचा मला जास्त अभिमान आहे”
4 / 7
“2014 मध्ये आपण खूप तरुण आणि भोळेभाबडे होतो. चांगला हेतू, सकारात्मक ऊर्जा आणि प्रोत्साहनामुळे आयुष्यात आपण पुढे जातो, असा आपण विचार करायचो. हे बरोबर आहे पण पुढे जाण्यासाठी आव्हानं सुद्धा महत्त्वाची असतात. बहुतांश आव्हानांचा तुला फक्त मैदानावरच सामना करावा लागला नाही. पण हे आयुष्य आहे? जिथे फार कमी अपेक्षा असतात. तिथे तुमची परीक्षा घेतली जाते” असं अनुष्काने लिहिलं आहे.
5 / 7
“तुझे जे चांगले हेतू होते, त्यामध्ये तू काही येऊ दिलं नाहीस, याचा मला अभिमान आहे. तू उदहारण देऊन नेतृत्व केलस. मैदानावर विजयासाठी पूर्ण ऊर्जा झोकून दिलीस. काही पराभवानंतर मी तुझ्या शेजारी बसले होते. त्यावेळी तुझ्या डोळ्यात अश्रू होते. यापेक्षा विजयासाठी अजून जास्त काय करु शकतो हाच विचार तुझ्यामध्ये असायचा. असा विचार करणारा विराट आहे. प्रत्येकाकडून अशीच अपेक्षा करतोस” असे अनुष्का शर्माने म्हटलं आहे.
6 / 7
तू परफेक्ट नाहीस, तुझ्यात काही दोष आहेत, पण मग ते लपवण्याचा प्रयत्न कधी तू केलास? तू नेहमीच योग्य आणि कठीण आव्हानांसमोर उभे राहिलास. तुला कधीही कशाचीही लालूच नव्हती, अगदी या पदाचीदेखील (कर्णधारपद) नाही आणि मला ते माहीत आहे. कारण जेव्हा कोणी एखाद्या गोष्टीला धरून ठेवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो स्वतःला मर्यादित करतो आणि तू अमर्याद आहेस.
7 / 7
अनुष्काने विराटचे वडील म्हणून कौतुक करत तिची पोस्ट संपवली. आपल्या मुलीचा संदर्भ देत तिने लिहिले आहे की, "या 7 वर्षात घेतलेले धडे आपली मुलगी एक वडिलांच्या रूपात तुझ्यात बघेल."