Arjun Tendulkar IPL 2023 : ज्याने वाढवला पगार, त्यालाच अर्जुन तेंडुलकर देणार ‘दणका’

Arjun Tendulkar IPL 2023: मागच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकर महागडा गोलंदाज ठरला होता. आजच्या त्याच्या कामगिरीकडे सगळ्यांच लक्ष असेल. एक ओव्हरमध्ये अर्जुन तेंडुलकरने 31 धावा दिल्या होत्या.

Arjun Tendulkar  IPL 2023 : ज्याने वाढवला पगार, त्यालाच अर्जुन तेंडुलकर देणार 'दणका'
Arjun TendulkarImage Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: Apr 25, 2023 | 9:07 AM

Arjun Tendulkar IPL 2023 : अर्जुन तेंडुलकर पुन्हा एकदा आग ओकणारी गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. यावेळी अर्जुन त्याचा पगार वाढवणाऱ्या टीमला दणका देण्यासाठी सज्ज आहे. आयपीएलच्या ऑक्शनमध्ये अर्जुन तेंडुलकरची बेस प्राइस 20 लाख रुपये होती. पण गुजरात टायटन्समुळे मुंबई इंडियन्सला त्याला 30 लाख रुपयांमध्ये विकत घ्याव लागलं. आता अर्जुन त्याच गुजरात विरुद्ध आयपीएलमधला आपला चौथा सामना खेळणार आहे. अर्जुनने कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध या सीजनमध्ये डेब्यु केला.

अर्जुनने त्याच्या दुसऱ्या मॅचमध्ये सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध भुवनेश्वर कुमारच्या रुपाने आपला पहिला विकेट काढला. आता तो हार्दिक पंड्याच्या गुजरातला आव्हान देण्यासाठी सज्ज आहे. फार कमी लोकांना माहित असेल, याच गुजरातमुळे ऑक्शनमध्ये अर्जुन तेंडुलकरची किंमत वाढली होती. मुंबईने अर्जुनला 2021 च्या ऑक्शनमध्ये 20 लाख रुपयांच्या बेस प्राइसला विकत घेतलं होतं. पण दुखापतीमुळे तो आयपीएलमधून बाहेर गेला.

अर्जुनसाठी कोणी दिली टक्कर?

आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला विकत घेतलं. पण यावेळी अर्जुनसाठी मुंबई बरोबर गुजरातने सुद्धा बोली लावली. त्यामुळे अर्जुनची किंमत 10 लाखाने वाढली. अर्जुनची ऑक्शनमध्ये बेस प्राइस 20 लाख रुपये होती. मुंबईने आधी बोली लावली. त्यानंतर गुजरातने 25 लाखाचा पुकार केला. त्यानंतर मुंबईने 30 लाखांचा आवाज दिला. पण त्यानंतर गुजरातने बोली लावली नाही.

अर्जुनच्या खात्यात किती विकेट?

गुजरातमुळे जास्तीचे 10 लाख रुपये मोजून मुंबईने अर्जुनला विकत घेतलं. अर्जुन मागचा सीजन बेंचवरच बसून होता. त्याला तिसऱ्या सीजनमध्ये डेब्युची संधी मिळाली. अर्जुन डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. त्याला डेब्यु मॅचमध्ये यश मिळालं नाही. पण मागच्या दोन सामन्यात त्याने 1-1 विकेट घेतला. रोहित शर्माच्या निर्णयाकडे लक्ष

मागच्या पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात त्याने धावा लुटवल्या. अर्जुनने 1 ओव्हरमध्ये 31 धावा दिल्या. आता गुजरात विरुद्धच्या सामन्यात कॅप्टन रोहित शर्मा काय निर्णय घेणार? त्याची उत्सुक्ता आहे. अर्जुनला पुन्हा संधी मिळते की, त्याला पुन्हा बेंचवर बसवणार.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.