Arjun Tendulkar ची रणजी ट्रॉफीमध्ये पुन्हा कमाल, या VIDEOमध्ये बघा
Arjun Tendulkar ने मागच्यावेळी बॅटिंगमध्ये यावेळी बॉलिंगमध्ये दाखवला करिष्मा.
Arjun Tendulkar Celebration Video: भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सातत्याने चर्चेमध्ये आहे. त्याने अलीकडेच फर्स्ट क्लासमध्ये डेब्यु केला होता. रणजी ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात त्याने कमाल केली. डेब्यु मॅचमध्ये अर्जुनने शतक ठोकलं होतं. त्याच अर्जुनने आता झारखंड विरुद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्यात शानदार गोलंदाजीच प्रदर्शन केलं. रणजी ट्रॉफीच्या ग्रुप सी मध्ये गोवा विरुद्ध झारखंडमध्ये सामना झाला.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
अर्जुनने या मॅचमध्ये परफेक्ट यॉर्कर टाकला. त्या यॉर्करसमोर फलंदाजाच काहीच चाललं नाही. तो क्लीन बोल्ड झाला. अर्जुनने या विकेटवर आपल्या स्टाइलमध्ये सेलिब्रेशन केलं. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होतोय.
रणजी ट्रॉफीमध्ये अर्जुनची धमाल
अर्जुन तेंडुलकर रणजी ट्रॉफी स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करतोय. आधी डेब्यु सामन्यात राजस्थान विरुद्ध शतकी खेळी आणि झारखंड विरुद्ध चांगली गोलंदाजी केली. अर्जुनने झारखंड विरुद्धच्या सामन्यात शाहबाज नदीम सारख्या बॅट्समनची विकेट काढली. शाहबाजला हा चेंडू समजलाच नाही. विकेट घेतल्यानंतर अर्जुनने सेलिब्रेशन सुद्धा केलं.
झारखंडने किती धावा केल्या?
जमशेदपूर येथे ग्रुप सी चा हा सामना सुरु आहे. झारखंडने पहिल्या डावात 386 धावा केल्या. विकेटकीपर फलंदाज कुमार कुशाग्रच शतक फक्त 4 रन्सनी हुकलं. त्याने 141 चेंडूत 11 चौकार आणि 3 षटकार लगावले. सौरभ तिवारीने 121 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 65 धावांच योगदान दिलं. गोव्याकडून दर्शन मिसाळने 4, मोहित रेडकरने 3 विकेट घेतल्या. अर्जुनने 26 ओव्हरमध्ये 90 धावा देऊन एक विकेट घेतला.
बोल्ड करने के बाद अर्जुन का किस तरह का सेलिब्रेशन है. pic.twitter.com/GknZJeeIaz
— binu (@binu02476472) December 21, 2022
2019 मध्ये डेब्यु
शाहबाज नदीम भारतासाठी दोन टेस्ट मॅच खेळलाय. त्याने 2019 साली रांचीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यात डेब्यु केला होता. शाहबाजने 2 कसोटी सामन्यात 8 विकेट घेतल्यात. तो आतापर्यंत 125 फर्स्ट क्लास सामने खेळलाय.