PAK विरुद्ध कॅच सोडल्यानंतर ‘त्या’ रात्री अर्शदीपची काय स्थिती होती? वेदनादायी वास्तव आलं समोर
आशिया कप 2022 स्पर्धा टीम इंडियाचा युवा गोलंदाज अर्शदीप सिंहसाठी खूप महत्त्वाची होती. झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज टूरनंतर तो कुठल्या मोठ्या स्पर्धेत खेळत होता.
मुंबई: आशिया कप 2022 स्पर्धा टीम इंडियाचा युवा गोलंदाज अर्शदीप सिंहसाठी खूप महत्त्वाची होती. झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज टूरनंतर तो कुठल्या मोठ्या स्पर्धेत खेळत होता. अर्शदीपसाठी आशिया कप वाईट स्वप्न ठरला. या टुर्नामेंट दरम्यान ट्रोलर्सनी सातत्याने त्याला टार्गेट केलं. पाकिस्तान विरुद्ध सामन्यात त्याने एक महत्त्वाची कॅच सोडली. त्यानंतर टीम इंडियाचा पराभव झाला.
हा झेल सुटल्यानंतर अर्शदीपची काय स्थिती होती? त्याबद्दल त्याच्या कोचनी खुलासा केला. अर्शदीप त्या रात्री झोपू शकला नाही.
कॅच सुटल्यानंतर ट्रोल
अर्शदीपच्या हातून कॅच सुटली. त्यामुळे टि्वटरवर त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. काहींनी अर्शदीपला गद्दार ठरवलं. त्याला खलिस्तानी सुद्धा म्हटलं. या दरम्यान काही दिग्गज खेळाडूंनी अर्शदीपच समर्थन केलं. टीमचा कॅप्टन रोहित शर्मा आपल्या खेळाडूंसोबत उभा होता.
अर्शदीप हैराण होता
“कुठल्याही अन्य खेळाडूप्रमाणे अर्शदीप हैराण होता. तू खूप मेहनत केलीस. तुला जास्त विचार करण्याची गरज नाही, हे आम्ही त्याला समजावलं” असं अर्शदीपचे कोच इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणाले.
तेव्हा कळलं की….
कॅच सुटल्यानंतर त्याला लास्ट ओव्हरमध्ये सात रन्स डिफेंड करायचे होते. “मी त्याच्याशी बोललो, तेव्हा कळलं की, तो संपूर्ण रात्र झोपू शकला नाही. अर्शदीपला ट्रोलर्सची चिंता नव्हती. तो आपल्या गोलंदाजीबद्दल विचार करत होता” असं त्याच्या कोचनी सांगितलं.
त्याच्या मनात एकच प्रश्न होता
“त्याला ट्रोलर्सची चिंता नव्हती. त्याच्या मनात एकच प्रश्न होता, त्याचा यॉर्कर चेंडू फुलटॉस कसा बनला” असं कोच म्हणाले. अर्शदीप सिंहची आता टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात निवड झालीय. जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल टीममध्ये परतल्यामुळे त्याला गोलंदाजीची संधी मिळेल का? हा प्रश्न आहे.