IND vs SA 1st T20: अवघ्या सेकंदाभरात Arshdeep ने असा बनवला डेविड मिलरला OUT करण्याचा प्लान
IND vs SA 1st T20: डेविड मिलरच्या डोक्यात काय चाललय हे अर्शदीपला कसं समजलं?
मुंबई: तिरुवनंतपुरमच्या पीचवर अर्शदीप सिंहने काल दक्षिण आफ्रिकेची वाट लावली. त्याच्या वेगवान आणि स्विंग होणाऱ्या चेंडूंसमोर दक्षिण आफ्रिकन फलंदाजांनी पूर्ण शरणागती पत्करली. या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांना एकाच ओव्हरमध्ये 3 विकेट घेतल्या. दक्षिण आफ्रिकेची टॉप ऑर्डर त्याच्या धारदार गोलंदाजीसमोर कोसळली. अर्शदीपने डिकॉक, रिली रूसो आणि डेविड मिलरची विकेट काढली.
खेळपट्टीकडून गोलंदाजांना भरपूर मदत मिळत होती, असं अर्शदीप सिंह सामन्यानंतर म्हणाला. डेविड मिलरचा विकेट जास्त आवडल्याचं अर्शदीपने सांगितलं.
हा चेंडू खरोखरच कमालीचा होता
अर्शदीप सिंहने डेविड मिलरला आपल्या इनस्विंगरवर आऊट केलं. हा चेंडू खरोखरच कमालीचा होता. “विकेटकडून गोलंदाजांना भरपूर मदत मिळत होती. दीपक भाईने माहोल बनवला होता. मी आपल्या प्लानुसार गोलंदाजी करणार होतो. डेविड मिलरचा विकेट मला जास्त आवडला” असं अर्शदीप म्हणाला.
डेविड मिलरने अर्शदीप सिंहला चकवलं
मी आऊट स्विंग टाकीन असं डेविड मिलरला वाटलं. पण त्याला चकवत मी इनस्विंग टाकला, असं अर्शदीप म्हणाला. “डेविड मिलर माझ्या आऊट स्विंगचा विचार करत होता. पण मी चेंडू आतमधल्या बाजूला टाकला. ती कमाल होती” असं अर्शदीप म्हणाला. अर्शदीपने एकाच ओव्हरमध्ये तीन विकेट काढल्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची स्थिती 5 बाद 9 धावा झाली.
5 wickets summed up in 11 seconds. Watch it here ?? Don’t miss the LIVE coverage of the #INDvSA match on @StarSportsIndia pic.twitter.com/jYeogZoqfD
— BCCI (@BCCI) September 28, 2022
टीम इंडियाच्या गोलंदाजांची कमाल
अर्शदीप सिंह शिवाय टीम इंडियाच्या दुसऱ्या गोलंदाजांनी सुद्धा पहिल्या टी 20 मध्ये कंमाल केली. दीपक चाहरने 4 ओव्हरमध्ये 24 धावा देऊन 2 विकेट घेतल्या. हर्षल पटेलने 4 ओव्हरमध्ये 26 धावा देऊन 2 विकेट आणि अक्षर पटेलने 4 ओव्हरमध्ये 16 धावा देऊन एक विकेट काढली. दक्षिण आफ्रिकेच्या संपूर्ण टीमने फक्त 106 धावा केल्या.