Arshdeep Singh | अर्शदीप सिंहचा निराशाजनक कमबॅक, एका बॉलमध्ये लुटवले तब्बल इतक्या धावा
IND vs SL 2nd T20I : अर्शदीप सिंहने श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात एकाच बॉलमध्ये 14 रन दिल्या.
पुणे : कर्णधार दासून शनाकाच्या वादळी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने दुसऱ्या टी 20 सामन्यात टीम इंडियाला विजयासाठी 207 धावांचं मजूबत आव्हान दिलंय. श्रीलंककेकडून शनाकाने नाबाद 56 आणि कुसल मेंडिसने 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर चरिथ असलंका आणि पाथुम निसांका या दोघांनी अनुक्रमे 37 आणि 33 रन्स केल्या. तर टीम इंडियाकडून उमरान मलिकने सर्वाधिक 3, अक्षर पटेलने 2 आणि युजवेंद्र चहलने 1 विकेट घेतली. अर्शदीपने सिंहने या सामन्यातून कमबॅक केलं. अर्शदीपने हॅटट्रिक घेत रेकॉर्ड केला. मात्र ही हॅटट्रिक विकेट्सची नव्हती तर नो बॉलची होती. (arshdeep singh delivered no ball hat trick in 2nd t20i against sri lanka at maharashtra cricket ground at pune)
सलग 3 नो बॉल
अर्शदीपने पहिल्या 5 बॉलमध्ये 5 धावा दिल्या. ओव्हर चांगली सुरु होती. मात्र शेवटच्या बॉलवर लोचा झाला. अर्शदीपने सलग 3 नो बॉल टाकले. याचा फायदा कुसल मेंडिसने घेतला. श्रीलंकेच्या ओपनरने फ्री हीटवर चौकार लगावला आणि एक सिक्स ठोकला.
सलग 3 नो बॉल टाकल्यानंतर अर्शदीपने सहावा बॉल नीट टाकला. अर्शदीपने सहावा बॉल शॉर्ट पीच टाकला. मेंडिसने सहावा बॉल पूल केला. विकेटकीपर ईशानने कॅच घेतला. मात्र फ्री हीट असल्याने विकेट मिळाली नाही.
नकोशा रेकॉर्ड
अर्शदीपने या ओव्हरमध्ये एकूण 19 धावा लुटवल्या, त्यापैकी अर्शदीपने 14 धावा या 1 बॉलमध्ये दिल्या. मात्र ही काही पहिली वेळ नव्हती की जेव्हा नो बॉल टाकला. याआधी ही अर्शदीप सातत्याने नो बॉल टाकले आहेत. याआधीही अर्शदीपने आशिया कपमध्ये हाँगकाँग विरुद्ध एकाच ओव्हरमध्ये 2 नो बॉल टाकले.
अर्शदीपने आपल्या 22 मॅचच्या छोट्या कारकीर्दीत खराब वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. अर्शदीपने आतापर्यंत 12 नो बॉल टाकले आहेत, जो एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे.
दुसऱ्या टी 20 साठी टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा, अक्षर पटेल, शिवम मावी, अर्शदीप सिंह, उमरान मलिक आणि युजवेंद्र चहल.
श्रीलंका प्लेईंग इलेव्हन : दासुन शानका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल मेंडिस, धनंजया डिसिल्वा, चरित असालंका, भानुका राजपक्षे, वानिंदु हसारंगा, चामिका करुणारत्ने, महीष तीक्षणा, कासुन रजिता आणि दिलशान मधुशंका.