Asia cup 2022: स्टेडियमबाहेर अर्शदीपला ‘तो’ गद्दार म्हणाला, त्यानंतर जे झालं ते… राड्याचा VIDEO पहा

Asia cup 2022: सुपर 4 च्या दोन्ही सामन्यानंतर सोशल मीडियावर अर्शदीपला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. हद्द तर तेव्हा झाली, जेव्हा एका व्यक्तीने मैदानाबाहेर अर्शदीपला थेट गद्दार म्हटलं.

Asia cup 2022: स्टेडियमबाहेर अर्शदीपला 'तो' गद्दार म्हणाला, त्यानंतर जे झालं ते... राड्याचा VIDEO पहा
ArshdeepImage Credit source: KOO
Follow us
| Updated on: Sep 07, 2022 | 3:21 PM

मुंबई: आशिया कप स्पर्धेतील टीम इंडियाच्या प्रदर्शनामुळे अनेक जण निराश आहेत. सुपर 4 राऊंडमध्ये टीम इंडियाला आधी पाकिस्तान नंतर श्रीलंकेकड़ून पराभव स्वीकारावा लागला. भारतीय खेळाडूंना चाहत्यांच्या नाराजीचा सामना करावा लागतोय. खासकरुन युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहवर जास्त नाराजी आहे. सुपर 4 च्या दोन्ही सामन्यानंतर सोशल मीडियावर अर्शदीपला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. हद्द तर तेव्हा झाली, जेव्हा एका व्यक्तीने मैदानाबाहेर अर्शदीपला थेट गद्दार म्हटलं.

‘बघा गद्दार आला’

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. टीम इंडियाचे खेळाडू बसमध्ये बसण्यासाठी स्टेडियम बाहेर पडताना दिसतायत. त्याचवेळी टीम बस जवळ उभ्या असलेल्या एका व्यक्तीने नको ते शब्द वापरले. अर्शदीप सिहं त्याच्या नजरेस पडताच, तो गद्दार म्हणाला. ‘बघा गद्दार आला, मॅचमध्ये कॅच सोडली’ असं तो व्यक्ती म्हणाला. अर्शदीपने ते शब्द ऐकले. बसमध्ये चढल्यानंतर गद्दार शब्द उच्चारणाऱ्याकडे त्याने नजर रोखून धरली होती. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या भारतीय पत्रकाराने गद्दार शब्द उच्चारणाऱ्याची चांगलीच कानउघडणी केली. त्याला खडेबोल सुनावले.

त्या ओव्हरमध्ये काय घडलं?

पाकिस्तान विरुद्ध सामन्यात मोक्याच्याक्षणी अर्शदीपकडून कॅच सुटली होती. फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई 18 व्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत होता. समोर पाकिस्तानी फलंदाज आसिफ अली होता. अर्शदीपकडून आसिफ अलीचा सोपा झेल सुटला. शेवटच्या ओव्हर्समध्ये भारताने कमबॅक केलं होतं. कदाचित हा झेल पकडला असता, तर निकाल वेगळा लागला असता. पाकिस्तान विरुद्धच्या या पराभवासाठी चाहते अर्शदीप सिंहला जबाबदार धरतायत. काहींनी त्याला खलिस्तानी सुद्धा म्हटलं. त्यासाठी पाकिस्तानात कारस्थान रचण्यात आलं.

लास्ट ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी

अर्शदीपकडून कॅच सुटली. पण त्याने पाकिस्तान आणि काल श्रीलंकेविरुद्ध शेवटच्या षटकात चांगली गोलंदाजी केली. श्रीलंकेला शेवटच्या षटकात 7 धावांची गरज होती. या धावा त्याने सहजासहजी करु दिल्या नाहीत. पाच पैकी चार चेंडू त्याने यॉर्कर टाकले. श्रीलंकेने विजय मिळवला. पण लास्ट ओव्हरमध्ये त्यांना एकही चौकार मारता आला नाही.

श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला.
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा.
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?.
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल.
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा.
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल.
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला.
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात.
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला.
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल.