IND vs WI: विकेट काढल्यानंतर अर्शदीपने कसला राग दिला, Reaction झाली व्हायरल, पहा VIDEO

IND vs WI: वेस्ट इंडिज विरुद्ध पहिल्या टी 20 मध्ये टीम इंडियाने दमदार विजय मिळवला. भारताने हा सामना 68 धावांनी जिंकला. टीम इंडियाच्या विजयात गोलंदाजांच महत्त्वपूर्ण योगदान आहे.

IND vs WI: विकेट काढल्यानंतर अर्शदीपने कसला राग दिला, Reaction झाली व्हायरल, पहा VIDEO
arshdeep singhImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jul 30, 2022 | 3:15 PM

मुंबई: वेस्ट इंडिज विरुद्ध पहिल्या टी 20 मध्ये टीम इंडियाने दमदार विजय मिळवला. भारताने हा सामना 68 धावांनी जिंकला. टीम इंडियाच्या विजयात गोलंदाजांच महत्त्वपूर्ण योगदान आहे. खासकरुन डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहने कमालीची गोलंदाजी केली. त्याने 24 धावा देऊन वेस्ट इंडिजच्या 2 विकेट काढल्या. अर्शदीप सिंहने अलीकडेच टीम इंडियात स्थान मिळवलय. त्याने आपल्या गोलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केलय.

अर्शदीप सिंहच सेलिब्रेशन व्हायरल

अर्शदीप सिंहने त्रिनिदाद मधील पहिल्या वनडे सामन्यात काइल मायर्सला आऊट केलं. डावखुऱ्या फलंदाजाला आऊट केल्यानंतर अर्शदीप सिंहची जी Reaction होती, ती व्हायरल झालीय. अर्शदीपने मायर्सला कॅच आऊट केल्यानंतर 4-5 सेकंद त्याच्याकडे डोळे रोखून ठेवले होते. अर्शदीप खूपच रागात दिसला. त्याला इतका राग का आला? त्याचं कारण ऐका.

मायर्सला हा चेंडू कळलाच नाही

अर्शदीप सिंह गोलंदाजीला करायला आल्यानंतर त्याच्या पहिल्याच चेंडूवर मायर्सने षटकार मारला. अर्शदीपच्या लेंग्थ चेंडूला त्याने लॉन्ग ऑनवरुन 6 धावांसाठी पाठवलं. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार ठोकला. पहिल्या दोन चेंडूवर अर्शदीपने षटकार आणि चौकार खाल्ला. पण त्यानंतर त्याने दमदार पुनरागमन केलं. अर्शदीपने स्लोअर बाऊन्सर टाकला. मायर्सला हा चेंडू कळला नाही. परिणामी त्याचा खेळ संपला. अर्शदीपने बदला घेतल्यानंतर मायर्सवर नजर रोखून धरली होती. अर्शदीपने त्यानंतर अकील होसैनला सुद्धा बोल्ड केलं.

अर्शदीप आपल्या प्रदर्शनावर खुश

“धीम्या गतीन टाकलेले चेंडू आणि यॉर्करच्या योग्य वापराचा फायदा झाला” असं अर्शदीप सिंहने मॅच नंतर प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं. “मी माझ्या प्रदर्शनावर खुश आहे. संघात माझा रोल काय असेल? त्याची मला कल्पना देण्यात आली आहे. त्यामुळे रणनिती बनवणं, माझ्यासाठी सोपं झालय. भुवनेश्वरने दुसऱ्याबाजूने दबाव बनवून ठेवल्यामुळे मला विकेट मिळाल्या” असं अर्शदीपने सामन्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितलं.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.