Ashes 2021: हवेत झेपावून बटलरची सुपरमॅन कॅच, हा VIDEO नक्की पाहा

हॅरिस अवघ्या तीन धावांवर बाद झाला. हॅरिस सहजतेने बाद झाला नाही. या विकेटचे सर्व श्रेय विकेटकिपर जोस बटलरचे आहे. हॅरिसचा झेलं पकडणं इतकं सोपं नव्हतं.

Ashes 2021: हवेत झेपावून बटलरची सुपरमॅन कॅच, हा VIDEO नक्की पाहा
या विकेटचे सर्व श्रेय विकेटकिपर जोस बटलरचे आहे. हॅरिसचा झेलं पकडणं इतकं सोपं नव्हतं.
Follow us
| Updated on: Dec 16, 2021 | 1:10 PM

मेलबर्न: अ‍ॅडलेड ओव्हलच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया-इंग्लंड दरम्यान (AUS vs ENG) अ‍ॅशेस मालिकेतील (Ashes Series) दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. या डे-नाईट कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला मार्कस हॅरिसच्या (Marcus harris) रुपाने प्रारंभीच झटका बसला. अवघ्या चार धावांवर ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट गेली. धमाकेदार सुरुवात करण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या अपेक्षांवर विकेटकीपर जोस बटलरने (jos bulter) पाणी फिरवलं. बटलरने डाव्या बाजूला सूर मारुन हॅरिसरचा जो झेल घेतला, त्याला तोड नाही.

इंग्लंडची धारदार गोलंदाजी 

इंग्लिश गोलंदाजांनी टिच्चून मारा केला, त्यामुळे ऑस्ट्रेलियाची संथ सुरुवात झाली. धावांसाठी त्यांना संघर्ष करावा लागत होता. डावखुरा आक्रमक फलंदाज डेविड वॉर्नरला इंग्लिश गोलंदाजांनी जखडून ठेवलं. त्यावरुन इंग्लंडच्या धारदार गोलंदाजीची कल्पना येते. वॉर्नर आणि हॅरिसची जोडी ब्रॉडने फोडली. आठव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर ब्रॉडने हॅरिसला तंबूत पाठवलं. हॅरिस अवघ्या तीन धावांवर बाद झाला. हॅरिस सहजतेने बाद झाला नाही. या विकेटचे सर्व श्रेय विकेटकिपर जोस बटलरचे आहे. हॅरिसचा झेलं पकडणं इतकं सोपं नव्हतं.

अप्रतिम विकेटकिपिंग कौशल्य

ब्रॉड हॅरिसला राऊंड द विकेट गोलंदाजी करत होता. त्याने शॉर्ट पीच बॉल टाकला. त्यावर हॅरिसला पुलचा फटका खेळायचा होता. पण चेंडू ग्लोव्हजला लागून यष्टीपाठी गेला. बटलरने लगेच डाव्या बाजूला झेपावून एक अप्रतिम झेल घेतला. या अप्रतिम विकेटकिपिंग कौशल्यासाठी बटलरचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे.

पहिल्या सत्राच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाने एक विकेट गमावून ४५ धावा केल्या आहेत. वॉर्नर २० आणि लाबुशेन १६ धावांवर खेळत आहेत. वॉर्नर २० धावा करण्यासाठी ७२ चेंडू खेळावे लागले. ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स कोविड पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्याला आयसोलेशन मध्ये जावे लागले आहे. त्याच्याजागी स्टीव स्मिथ ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करत आहे.

संबंधित बातम्या: विराट आणि सौरव गांगुलीमध्ये नेमकं खरं कोण बोलतय? कॉमेट्री बॉक्समध्ये ईशा गुहाच्या डबल मीनिंग गुगलीवर गिलख्रिस्ट क्लीन बोल्ड India tour of South Africa: स्फोटक प्रेस कॉन्फरन्सनंतर विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....