Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LSG vs MI IPL 2023 : 49 रन्सवर खेळताना Krunal Pandya ने जे केलं, ते योग्य का? अश्विनचा थेट सवाल

LSG vs MI IPL 2023 : सोशल मीडियावर सुद्धा अनेकांनी कृणालच्या कृतीबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. खरंतर टीम संकटात असताना कृणाल पांड्याने महत्वाचा रोल निभावला. त्याने मार्कस स्टॉयनिससोबत मिळून डाव सावरला.

LSG vs MI IPL 2023 : 49 रन्सवर खेळताना Krunal Pandya ने जे केलं, ते योग्य का? अश्विनचा थेट सवाल
Krunal Pandya IPL 2023
Follow us
| Updated on: May 17, 2023 | 10:20 AM

लखनऊ : इंडियन प्रीमियर लीगमध्ये काल लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्समध्ये सामना झाला. लखनऊच्या टीमने पहिली बॅटिंग केली. बॅटिंगसाठी कठीण असलेल्या विकेटवर लखनऊच्या टीमने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 177 धावा केल्या. लखनऊच्या इकाना क्रिकेट स्टेडियमवर ही मॅच झाली. लखनऊ टीमने ज्या धावा केल्या, त्याचं श्रेय मार्कस स्टॉयनिसला जातं. त्याने 47 चेंडूत नाबाद 89 धावा फटकावल्या. LSG ने शेवटच्या 3 ओव्हर्समध्ये 54 धावा फटकावल्या. त्यामुळे लखनऊची धावसंख्या 177 पर्यंत पोहोचली.

कॅप्टन कृणाल पांड्याने सुद्धा काल महत्वाच्या क्षणी चांगला खेळ केला. सुरुवातीलाच लखनऊ टीमला तीन मोठे झटके बसले होते. त्यावेळी कृणालने स्टॉयनिससोबत मिळून डाव सावरला. 49 धावांवर खेळत असताना कृणालने दुखापतीमुळे मैदान सोडलं.

एकवेळ लखनऊची खराब अवस्था

कृणाल आणि स्टॉनिसने मिळून 82 धावांची भागीदारी केली. IPL 2023 मध्ये लखनऊ येथे झालेली ही सर्वात मोठी भागीदारी आहे. दिल्ली विरुद्ध हुड्डा आणि कायली मेयर्सने 79 धावांची भागीदारी केली होती. कालच्या सामन्यात लखनऊच्या 3 बाद 35 धावा होत्या. पण 16 व्या ओव्हरच्या अखेरीस 3 बाद 177 अशी लखनऊची स्थिती होती.

आर.अश्विनकडून प्रश्नचिन्ह

16 ओव्हरच्या अखेरीस 49 धावांवर खेळत असताना कृणाल पंड्याने मैदान सोडलं. बॅटिंग करताना दुखापत झाल्यामुळे कृणाल मैदानाबाहेर गेला. कृणाल बाहेर गेल्यानंतर निकोलस पूरन आला. कृणालच्या मैदान सोडण्याच्या निर्णयावर अन्य नेटीझन्सप्रमाणे टीम इंडियाचा गोलंदाज आर.अश्विनने सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण केलं. कॉमेंटेटर्स कृणालला दुखापत झाल्याच सांगत होते. त्याचवेळी अन्य नेटीझन्सप्रमाणे अश्विनच्या मते सुद्धा ही रणनितीक चाल होती.’रिटायर्ड आऊट ?’ असं टि्वट अश्विनने केलं. असा जिंकला सामना

कृणालच्या जागी निकोलस पूरन मैदानावर येऊन विशेष काही फरक पडला नाही. त्याने 8 चेंडूत 8 धावा केल्या. स्टॉयनिस लखनऊ टीमसाठी संकटमोचक ठरला. त्याने शेवटच्या चार ओव्हर्समध्ये 16 चेंडूंचा सामना करताना 40 धावा केल्या. लखनऊने 177 धावा केल्या. मुंबईने विजयासाठी दिलेल्या 178 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 5 बाद 172 धावा केल्या. लखनऊने हा सामना 5 धावांनी जिंकला.

मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.
साताऱ्यातील त्या मजूर कुटुंबातील चिमुकल्याचा वैद्यकीय खर्च शिंदे करणार
साताऱ्यातील त्या मजूर कुटुंबातील चिमुकल्याचा वैद्यकीय खर्च शिंदे करणार.
संतापजनक... कचऱ्यात 6 ते 7 अर्भकं, राज्य महिला आयोगाकडून दखल अन्...
संतापजनक... कचऱ्यात 6 ते 7 अर्भकं, राज्य महिला आयोगाकडून दखल अन्....