Asia cup 2022: दोन दिवसात स्पष्ट होणार राहुल द्रविड जाणार की नाही? आता तब्येत कशी आहे?

आशिया कप (Asia cup) आधी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. भारतीय संघाचे हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांना कोरोना व्हायरसची (Corona virus) लागण झाली आहे.

Asia cup 2022: दोन दिवसात स्पष्ट होणार राहुल द्रविड जाणार की नाही? आता तब्येत कशी आहे?
Rahul dravidImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Aug 23, 2022 | 5:19 PM

मुंबई: आशिया कप (Asia cup) आधी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. भारतीय संघाचे हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांना कोरोना व्हायरसची (Corona virus) लागण झाली आहे. ते आशिया कप स्पर्धेसाठी जाऊ शकतात की, नाही ते दोन दिवसात स्पष्ट होईल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम आशिया कपसाठी दुबईला रवाना झाली आहे. पण द्रविड संघासोबत गेलेले नाहीत. आशिया कप स्पर्धेची सुरुवात 27 ऑगस्टपासून होणार आहे. स्पर्धेतील भारताचा पहिला सामना 28 ऑगस्टला पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. रिपोर्ट्सननुसार, यूएईला रवाना होण्याआधी भारतीय कोच राहुल द्रविड यांची कोविड 19 चाचणी करण्यात आली होती.

कशी आहे द्रविड यांची तब्येत

राहुल द्रविड यांची गुरुवारी पुन्हा कोरोना चाचणी करण्यात येईल. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला, तर ते दुबईला जाऊ शकतात. पण सध्या व्हीव्हीएस लक्ष्मण यांना स्टँडबायवर सज्ज रहाण्यास सांगण्यात आले आहे. इनसाइड स्पोर्ट्ने बीसीसीआयच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. “बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली राहुल द्रविड यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्यामध्ये कोविडची सौम्य लक्षण आढळून आली आहेत. त्यांचा कोविड रिपोर्ट् निगेटिव्ह आल्यानंतर ते पुन्हा संघासोबत जॉईन होतील. 23 ऑगस्टला संपूर्ण संघ दुबईमध्ये एकत्र जमणार आहे” असं बीसीसीआयच्या स्टेटमेंट मध्ये म्हटलं आहे.

राहुल द्रविड यांचं महत्त्व समजून घ्या

वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेनंतर राहुल द्रविड यांनी ब्रेक घेतला होता. राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाची चांगली बांधणी झाली आहे. इंग्लंड मधील वनडे आणि टी 20 मालिका भारताने जिंकली. त्यानंतर वेस्ट इंडिज विरुद्ध वनडे आणि टी 20 मालिकेत विजय मिळवला. राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाची बेंच स्ट्रेंथ मजबूत झाली आहे. त्यामुळे राहुल द्रविड यांचं संघासोबत नसणं, हा टीमसाठी एक झटकाच आहे.

आशिया कपसाठी भारतीय टीम: रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक हुड्डा, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, रवि बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान.

स्टँडबाय: श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, दीपक चाहर

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.