भारताच्या 3 फलंदाजांचा Asia cup मध्ये जबरदस्त रेकॉर्ड, यावेळी सचिनलाही टाकतील मागे

आशिया कप (Asia cup) स्पर्धा 27 ऑगस्टपासून सुरु होत आहे. अफगाणिस्तान आणि बांगलादेश मध्ये पहिला टी 20 सामना होणार आहे. भारतीय संघ 28 ऑगस्टला पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे.

भारताच्या 3 फलंदाजांचा Asia cup मध्ये जबरदस्त रेकॉर्ड, यावेळी सचिनलाही टाकतील मागे
Sachin Tendulkar Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: Aug 24, 2022 | 8:02 AM

मुंबई: आशिया कप (Asia cup) स्पर्धा 27 ऑगस्टपासून सुरु होत आहे. अफगाणिस्तान आणि बांगलादेश मध्ये पहिला टी 20 सामना होणार आहे. भारतीय संघ 28 ऑगस्टला पाकिस्तान (IND vs PAK) विरुद्ध खेळणार आहे. या स्पर्धेत जबरदस्त क्रिकेट पहायला मिळेल, कारण टी 20 चा फॉर्मेट आहे. क्रिकेटच्या या फॉर्मेट (Cricket Format) मध्ये कुठलाही संघ जिंकू शकतो. आशिया कप मध्ये भारताबद्दल बोलायच झाल्यास फलंदाजी दमदार आहे. या स्पर्धेत भारताने नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. आशिया कप मध्ये भारताचा सर्वात मोठा ‘रन’वीर कोण आहे, ते जाणून घेऊया. आशिया कप स्पर्धेत खेळताना भारताकडून विद्यमान संघातील रोहित शर्माने सर्वाधिक धावा केल्या आहेत. रोहित शर्मा आशिया कपचे 27 सामने खेळला आहे. त्याने 42 पेक्षा जास्त सरासरीने 883 धावा केल्या आहेत. रोहित शर्माने एका शतक आणि सात अर्धशतक झळकावली आहेत.

दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरवर कोण?

दुसऱ्या नंबरवर दिग्गज फलंदाज विराट कोहली आहे. कोहलीने आशिया कप स्पर्धेत खेळताना 16 सामन्यात 63 च्या सरासरीने सर्वाधिक 766 धावा केल्या आहेत. विराटन पाकिस्तान विरुद्ध 183 धावांची इनिंग खेळला होता. ही त्याच्या वनडे करीयरमधील बेस्ट इनिंग आहे. विद्यमान संघातील दिनेश कार्तिक आशिया कप मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तिसऱ्या नंबरवर आहे. कार्तिकने आशिया कपच्या 12 सामन्यात 43 पेक्षा जास्त सरासरीने 302 धावा केल्या आहेत. यात एक अर्धशतक आहे.

सचिनच्या नावावर सर्वाधिक धावा

आशिया कप स्पर्धेत सर्वाधिक धावा सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने या स्पर्धेत खेळताना 2 शतकं आणि 7 अर्धशतक झळकावली आहेत. त्याने एकूण 971 धावा फटकावल्या आहेत. रोहित शर्मा आता सचिनपासून जास्त लांब नाहीय. आशिया कप मध्ये रोहित सचिनला मागे टाकू शकतो.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.