IND vs PAK: ‘या’ चार कारणांमुळे भारताने पाकिस्तान विरुद्ध जिंकला सामना

IND vs PAK: भारताने विजयाने आशिया कप 2022 (Asia cup) स्पर्धेचा शुभारंभ केला आहे. हा सामना भारताने जिंकला, पण त्यामागे विजयाची काय कारण आहेत? ते समजून घेऊया.

IND vs PAK: 'या' चार कारणांमुळे भारताने पाकिस्तान विरुद्ध जिंकला सामना
hardik pandya rohit sharmaImage Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Aug 29, 2022 | 7:25 AM

मुंबई: भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामन्याकडे सगळ्या क्रिकेट जगताचे लक्ष लागले होते. कारण या सामन्यात क्रिकेटचा सर्वोच्च रोमांच अनुभवता येतो. कालचा सामना सुद्धा अगदी तसाच झाला. अगदी शेवटच्या षटकात निकाल लागला. ते ही हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) खास स्टाइल मध्ये विजय मिळवून दिला. दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम मध्ये रविवारी ही मॅच झाली. भारताने विजयाने आशिया कप 2022 (Asia cup) स्पर्धेचा शुभारंभ केला आहे. हा सामना भारताने जिंकला, पण त्यामागे विजयाची काय कारण आहेत? ते समजून घेऊया.

  1. शानदार गोलंदाजी हे भारताच्या विजयाचं एक कारण आहे. रोहित शर्माने टॉस जिंकून आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारु दिली नाही. पाकिस्तानला 147 धावांवर रोखलं. महत्त्वाचं म्हणजे भारताच्या वेगवान गोलंदाजांनी सर्वच्या सर्व 10 विकेट घेतल्या.
  2. भुवनेश्वर कुमारने या सामन्यात चार विकेट काढल्या. पाकिस्तान विरुद्ध टी 20 क्रिकेट मध्ये सर्वोत्तम प्रदर्शन करणारा भुवनेश्वर कुमार भारताचा पहिला गोलंदाज ठरला आहे. भुवनेश्वरने बाबर आजमची विकेट काढून भारताला सर्वात मोठ यश मिळवून दिलं. त्या झटक्यातून शेवटपर्यंत पाकिस्तानी संघ बाहेर आलाच नाही.
  3. रवींद्र जाडेजा या सामन्यात चौथ्या नंबरवर फलंदाजी करण्यासाठी आला होता. त्याचं या सामन्यात प्रमोशन झालं होतं. टीम मॅनेजमेंटचा निर्णय योग्य असल्याचही त्याने सिद्ध केलं. जाडेजाने शानदार इनिंग खेळून संघाच्या विजयात महत्त्वाच योगदान दिलं. त्याने 29 चेंडूत 35 धावा केल्या. तो शेवटच्या षटकात आऊट झाला.
  4. हार्दिक पंड्याने या सामन्यात मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावला. भारताला 12 चेंडूत 21 धावांची आवश्यकता होती. पंड्याने 19 व्या षटकात तीन चौकार मारले. त्यामुळे चेंडू आणि धावांमधल अंतर मोठ्या प्रमाणात कमी झालं. अखेरच्या षटकात 6 चेंडूत विजयासाठी 7 धावांची आवश्यकता होती. त्याने या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर षटकार ठोकून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. गोलंदाजी मध्ये सुद्धा हार्दिकने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने तीन विकेट घेतले.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.