Suryakumar Yadav ने विकत घेतली ‘मर्सिडीज बेन्झ’, रवींद्र जाडेजा वाट पाहतोय ‘रोल्स रॉईस’ची

टीम इंडियातील अनेक स्टार खेळाडूंना महागड्या गाड्यांची आवड आहे. त्यांच्या ताफ्यात अनेक आलिशान गाड्या आहेत.

Suryakumar Yadav ने विकत घेतली ‘मर्सिडीज बेन्झ’, रवींद्र जाडेजा वाट पाहतोय ‘रोल्स रॉईस’ची
surya-jadeja
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 4:36 PM

मुंबई: टीम इंडियातील अनेक स्टार खेळाडूंना महागड्या गाड्यांची आवड आहे. त्यांच्या ताफ्यात अनेक आलिशान गाड्या आहेत. भारताचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादवने आता त्याच्या ताफ्यात महागड्या ‘मर्सिडीज बेन्झ’चा कारचा समावेश केला आहे. ही कार विकत घेण्यासाठी सूर्यकुमार यादवने 2.15 कोटी रुपये मोजले. दुसऱ्याबाजूला रवींद्र जाडेजा ‘रोल्स रॉईस’ कारच्या डिलिव्हरची वाट पाहतोय. ‘रोल्स रॉईस’ ही जगातील सर्वात महागडी, आलिशान कार आहे. कुठल्याही श्रीमंत व्यक्तीची ही कार आपल्या गॅरेज मध्ये उभी असावी, अशी इच्छा असते. सूर्यकुमार यादवकडे अनेक महागड्या गाड्या आणि बाईक्स आहेत. सूर्यकुमार यादव बऱ्याचदा कुटुंब आणि गाड्यासोबत जास्त वेळ घालवताना दिसतो. इनसाइड स्पोर्टने हे वृत्त दिलय.

त्याने त्यासाठी 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मोजली

नवी कोरी ‘मर्सिडीज बेन्झ’ विकत घेण्यासाठी सूर्यकुमारने 2.15 कोटी रुपये मोजले. ‘मर्सिडीज बेन्झ’ हा कार मधला जगातला एक लोकप्रिय बँड आहे. जर्मन ऑटोमोबाइल कंपनीकडून या कारची निर्मिती केली जाते. सूर्यकुमारने मर्सिडीजचे कुठले मॉडेल विकत घेतले, त्याबद्दल माहिती नाहीय. पण त्याने त्यासाठी 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मोजली. सूर्यकुमार यादव सध्या चांगल्या फॉर्म मध्ये आहे. इंग्लंड मधल्या टी 20 सामन्यात त्याने शतक ठोकले, तर वेस्ट इंडिज विरुद्ध त्याने मॅच विनिंग अर्धशतकी खेळी साकारली. मुकेश अंबानी यांच्या मुंबई इंडियन्स फ्रेंचायजीने सूर्यकुमार यादवला रिटेनही केलं

सूर्यकुमार यादवकडे कुठल्या कार्स आहेत?

सूर्यकुमार यादवकडे आलिशान कार्सच कलेक्शन आहे. यात BMW 5 सीरीज, 530d एम स्पोर्ट, ऑडी ए6, रेंज रोव्हर, हुंडाय i20, फॉर्च्युनर या महागड्या गाडया आहेत. त्याशिवाय सुझूकी हायाबुस आणि हार्ली डेविडसन सारख्या महागड्या बाईक्सही आहेत. या सगळ्या कार्सची मिळून किंमत कितीतरी कोट्यवधींच्या घरात जाते.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.