प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूने सहकाऱ्याच्याच हातावर मारली बॅट, TV शो मधली घटना, VIDEO
सध्या आशिया कप (Asia cup) स्पर्धा सुरु आहे. त्यामुळे मॅच सुरु होण्याआधी वेगवेगळ्या चॅनल्सवर Live Tv शो चं आयोजन केलं जातं.
मुंबई: सध्या आशिया कप (Asia cup) स्पर्धा सुरु आहे. त्यामुळे मॅच सुरु होण्याआधी वेगवेगळ्या चॅनल्सवर Live Tv शो चं आयोजन केलं जातं. या कार्यक्रमांमध्ये एक्सपर्ट कोण हरणार, कोण जिंकणार, कोणाला संधी दिली पाहिजे, यावर आपली मत मांडत असतात. सध्या विविध चॅनल्सवर असे वेगवेगळे कार्यक्रम सुरु आहेत. अशाच एका TV शो दरम्यान एक अशी घटना घडली, जी याआधी कधी घडली नव्हती. म्हणजे जे काही झालं, ते चुकीने घडलं. मुद्दामून कोणी केलं नाही. स्टार स्पोर्ट्स तामिळवर आशिया कप कव्हरेज दरम्यान हे घडलं. प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू श्रीकांत (Srikant) यांच्या हातातील बॅटमुळे हेमांग बदानीच्या हाताला दुखापत झाली. बदानी यावेळी शो मध्ये श्रीकांतच्या शेजारी उभा होता. दोघे सामन्याच विश्लेषण करत होते. श्रीकांत आणि बदानी दोघे टीम इंडियातून खेळले आहेत.
बॅट कशी लागली?
27 ऑगस्टला अफगाणिस्तान आणि श्रीलंकेत आशिया कप मधला पहिला सामना खेळला गेला. दोन्ही क्रिकेटपटू प्री शो करत होते. त्यावेळी श्रीकांत यांच्या हातात बॅट होती. ते एका क्रिकेटींग शॉट बद्दल सांगत होते. श्रीकांत Action करुन समजावत असतानाच बॅटचा स्विंग थेट हेमांग बदानीच्या हातावर आदळला.
#HemangBadani #KrisSrikanth#AsiaCup
I am in terrible pain but luckily no fracture: Hemang Badani ? pic.twitter.com/uSx0Wduz1t
— Express Cricket (@IExpressCricket) August 28, 2022
Always #BleedBlue #AsiaCup2022 #INDvsPAK pic.twitter.com/2ndSgoLrut
— Hemang Badani (@hemangkbadani) August 28, 2022
हेमांग बदानीच्या हाताला दुखापत
मुद्दामून नाही, अनावधानाने हा प्रकार घडला. माजी क्रिकेटपटू हेमांग बदानी यांच्या हाताला यामुळे दुखापत झाली आहे. त्यांनी आपला एक फोटोही टि्वटरवर पोस्ट केलाय. ज्यात त्यांच्या हाताला पट्टी बांधलेली दिसतेय. दुखापत झालीय. पण सुदैवाने फ्रॅक्चर झालेलं नाही. हेमांग बदानीवर औषध उपचार सुरु आहेत. लवकरच स्वस्थ होऊन तो पुन्हा सेटवर येईल.