Asia cup 2022: पाकिस्तानला भिडण्याआधी कोच VVS Laxman यांनी आज रात्री बोलवली महत्त्वाची बैठक
आशिया कप (Asia cup) स्पर्धा येत्या 27 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत कुठला संघ सरस ठरणार? त्या बद्दल आधीपासूनच चर्चा सुरु आहे.
मुंबई: आशिया कप (Asia cup) स्पर्धा येत्या 27 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत कुठला संघ सरस ठरणार? त्या बद्दल आधीपासूनच चर्चा सुरु आहे. सर्वांचच लक्ष भारत, पाकिस्तान या दोन संघांवर आहे. कारण स्पर्धेतील हे दोन बलाढ्य संघ आहेत. राहुल द्रविड (Rahul Dravid) यांना कोरोना झाल्यामुळे सध्या व्ही.व्ही. एस लक्ष्मण (Vvs laxman) यांच्याकडे हेड कोचची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ते टीमसोबत दुबईला गेले आहेत. प्रॅक्टिस सेशन मध्ये भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष्मण बारीक लक्ष ठेवून आहेत. आज रात्री 9.30 वाजता लक्ष्मण यांनी संघाची महत्त्वपूर्ण बैठक बोलवली आहे. उच्चस्तरीय सूत्रांच्या हवाल्याने इनसाइडस्पोर्ट्ने हे वृत्त दिलय. व्हीव्ही एस लक्ष्मण, कॅप्टन रोहित शर्मासोबत स्वत: बैठकीसाठी संघासोबत मैदानात हजर असतील.
उष्ण वातावरणाशी जुळवून घ्याव लागेल
आशिया चषकासाठी व्ही.व्ही.एस लक्ष्मण यांची भारतीय संघाचे हंगामी कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नियमित प्रशिक्षक राहुल द्रविड यांना कोरोनाची लागण झालीय. द्रविड कोविड मधून बरे होईपर्यंत लक्ष्मण मुख्य कोचपदाची धुरा संभाळणार आहेत. भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा संघ दुबई मध्ये दाखल झाला असून त्यांनी सराव सुरु केला आहे. प्रॅक्टिस सेशन सर्वच खेळाडूंसाठी महत्त्वाचं आहे. आखाती देशामध्ये उष्ण वातावरण असते. त्यामुळे खेळाडूंना त्या वातावरणाशी जुळवून घ्याव लागणार आहे.
King Virat Kohli and King Babar Azam#ViratKohli? #BabarAzam?#INDvPAK#AsiaCup2022 Video from Bcci pic.twitter.com/ReiALZvk9Q
— Ahsan Tariq (@AhsanKashmiri89) August 24, 2022
रोहित शर्माची डोकेदुखी
भारत-पाकिस्तान सामन्याच्यावेळी पराभव कोणालाच मान्य नसतो. त्यामुळे या हाय प्रेशर गेम मध्ये संघ निवड महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या लढतीआधी रोहित शर्माला बराच विचार करावा लागेल. जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल दुखापतीमुळे आशिया कप मध्ये नाहीयत. रोहितला युवा वेगवान गोलंदाजांवर अवलंबून रहावं लागणार आहे. त्याशिवाय दिनेश कार्तिकला संघात कसं बसवायचं? हा सुद्धा रोहित समोर प्रश्न आहे. पहिले पाच फलंदाज कोण असतील? ते जवळपास निश्चित आहे. स्वत: रोहित शर्मा केएल राहुल सोबत सलामीला येईल. विराट कोहली नंबर 3 वर, सूर्यकुमार यादव चौथ्या आणि ऋषभ पंत पाचव्या स्थानावर येईल.