IND vs PAK: पाकिस्तान विरुद्ध फिल्डिंगच्या वेळी कोहली बाहेर का बसला होता? ‘हे’ आहे कारण

IND vs PAK: पाकिस्तान विरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाला. पण काल विराट कोहलीची बॅट तळपली. त्याने 44 चेंडूत 60 धावांची दमदार खेळी केली. यात चार चौकार आणि एक षटकार होता.

IND vs PAK: पाकिस्तान विरुद्ध फिल्डिंगच्या वेळी कोहली बाहेर का बसला होता? 'हे' आहे कारण
Virat kohliImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Sep 05, 2022 | 10:09 AM

मुंबई: आशिया कप स्पर्धेत काल दुसऱ्यांदा भारत-पाकिस्तानचे संघ आमने-सामने आले. आता सुपर 4 राऊंड सुरु झालाय. पाकिस्तानने काल टीम इंडियाचा पाच विकेटने पराभव केला. दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम मध्ये हा सामना झाला. पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने 7 विकेट गमावून 181 धावा केल्या. पाकिस्तानने शेवटच्या षटकात विजयी लक्ष्य पार केलं.

सलग दुसरं अर्धशतक

पाकिस्तान विरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाला. पण काल विराट कोहलीची बॅट तळपली. त्याने 44 चेंडूत 60 धावांची दमदार खेळी केली. यात चार चौकार आणि एक षटकार होता. विराट कोहलीची बॅटिंग पाहून तो फॉर्म मध्ये परतल्याचे संकेत मिळत आहेत. विराटने आशिया कपच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध 35 धावा केल्या. हाँगकाँग विरुद्ध दुसऱ्या मॅच मध्ये नाबाद 59 धावांची खेळी केली होती. विराटच हे सलग दुसरं अर्धशतक आहे.

या प्रश्नाच उत्तर मिळालं

विराट कोहलीने काल दमदार खेळ दाखवला. पण फिल्डिंगच्यावेळी तो डगआऊट एरीया मध्ये बसून होता. अनेकांना प्रश्न पडला होता की, विराट मैदानावर का नाहीय? विराट एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. फिल्डिंगच्यावेळी तो डगआऊट मध्ये का बसून आहे? या प्रश्नाच उत्तर मिळालं आहे. विराटला पायाच्या स्नायूंमध्ये त्रास होत होता.

कोहलीने चौकार वाचवण्यासाठी डाइव्ह मारला

सातव्या ओव्हर मध्ये चहल गोलंदाजी करत होता. चहलच्या चेंडूवर रिजवानने लाँग ऑफ रीजनमध्ये शॉट मारला. त्यावेळी कोहलीने चौकार वाचवण्यासाठी डाइव्ह मारला. पण चेंडूने सीमारेषा पार केली. त्यावेळी कोहलीला त्रास जाणवला. त्यानंतर कोहली 3-4 ओव्हरपर्यंत मैदानात फिल्डिंग करत होता. त्याने फखर झमनची कॅचही पकडली. त्यानंतर कोहली डग आऊट मध्ये बसून होता.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.