Asia Cup 2023 : पाकिस्तानला झटका, BCCI ने पीसीबला दाखवून दिली जागा
Asia Cup 2023 : माज दाखवणाऱ्या पाकिस्तानला एकट पाडून दाखवलं. पाकिस्तानने विरोधात भूमिका घेतली, तर त्यात त्यांचच जास्त नुकसान आहे. कारण बीसीसीआयकडे आर्थिक शक्ती आहे.
लाहोर : आशिया कपच्या आयोजनावरुन भारताला आव्हान देण्याची भाषा करणाऱ्या पाकिस्तानला बीसीसीआयने त्यांची जागा दाखवून दिलीय. पाकिस्तान आशियाई क्रिकेट वर्तुळात एकटा पडलाय. यावर्षी होणारी आशिया कप टुर्नामेंट पाकिस्तान बाहेर हलवण्यासाठी श्रीलंकन क्रिकेट बोर्ड आणि बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने भारतीय क्रिकेट बोर्डाला पाठिंबा दिलाय.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी हा एक मोठा झटका आहे. पाकिस्तान आपल्या देशात आशिया कपच आयोजन करण्यासाठी आग्रही होता. आशिया कप पाकिस्तान बाहेर जाणार असेल, तर बांग्लादेश आणि श्रीलंका दोन्ही देश ही टुर्नामेंट आयोजित करण्यासाठी तयार आहेत, असं जिओ स्पोर्ट्सने म्हटलय.
बीसीसीआयने आधीच जाहीर केलेलं
बीसीसीआयने आधीच आशिया कपसाठी पाकिस्तानात टीम पाठवायला नकार दिला होता. पाकिस्तान ऐवजी तटस्थ ठिकाणी आशिया कपच आयोजन करावं, अशी बीसीसीआयची भूमिका होती. पीसीबीचे प्रमुख नजम सेठी म्हणाले की, “टुर्नामेंटच आयोजन दुसऱ्या देशात केलं, तर तिथे पाकिस्तान टीम खेळणार नाही”
पाकिस्तानने प्रतिआव्हान दिलं, पण…..
पाकिस्तान आशिया कपमध्ये खेळणार नसेल, तर आशियाई क्रिकेट काऊन्सिल संयुक्त अरब अमिरातीमध्ये स्पर्धेत आयोजन करण्याचा विचार करु शकते. बीसीसीआयने आशिया कपसाठी पाकिस्तानात जाणार नाही, अशी भूमिका घेतली, तेव्हा पाकिस्तानने सुद्धा वर्ल्ड कपसाठी आम्ही भारतात येणार नाही, अंस जाहीर केलं. पाकिस्तानचच उलट नुकसान
बीसीसीआय आपल्या भूमिकेवर ठाम आहे. बीसीसीआयकडे आर्थिक ताकत आहे. पाकिस्तान भारताविरुद्ध खेळला नाही, तर त्यात त्यांचच उलट नुकसान आहे. टीम इंडिया विरुद्ध सीरीजमध्ये अन्य देशांच्या क्रिकेट बोर्डाचा फायदा असतो. त्यामुळे श्रीलंका, बांग्लादेश पाकिस्तानसोबत जाणार नाहीत.