Ind vs pak : महत्त्वाची मॅच, KL Rahul ला खेळवण्यासाठी टीम मॅनेजमेंट आता कोणाची विकेट काढणार?

Ind vs pak : KL Rahul फिट होऊनही रोहित-द्रविड यांची डोकेदुखी कायम आहे. कॅप्टन रोहित शर्मा आणि हेड कोच राहुल द्रविड यांना एक कुठलातरी निर्णय घ्यावाच लागेल. आशिया कप स्पर्धेत येत्या 10 सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध महत्त्वाचा सामना होणार आहे.

Ind vs pak : महत्त्वाची मॅच, KL Rahul ला खेळवण्यासाठी टीम मॅनेजमेंट आता कोणाची विकेट काढणार?
टीम इंडियाचा स्टार खेळाडू के. एल राहुल दुखापतीमधून पूर्णपणे बरा झाला आहे. आशिया कपमधील सुपर 4 फेरीमधील सामन्यांमध्ये खेळताना दिसेल. आयपीएलमध्ये मांडीला दुखापत झाल्याने बाहेर पडलेल्या राहुलने आता कमबॅक केलं आहे. अशातच के. एल. राहुल याची वर्ल्ड कप संघामध्ये निवड झालेली आहे.
Follow us
| Updated on: Sep 07, 2023 | 9:13 AM

कोलंबो : सध्या टीम इंडिया आशिया कपमध्ये व्यस्त आहे. पुढच्या महिन्यात भारतात वनडे वर्ल्ड कप टुर्नामेंटला सुरुवात होणार आहे. त्यासाठी दोन दिवसांपूर्वी टीम इंडिया जाहीर करण्यात आली. केएल राहुलचा वर्ल्ड कपच्या टीममध्ये समावेश केला आहे. केएल राहुल दुखापतग्रस्त होता. त्यामुळे टीम इंडियाची चिंता वाढली होती. आता खेळण्यासाठी तो पुन्हा फिट झालाय. केएल राहुलच फिट होणं ही टीम इंडियासाठी चांगली बाब आहे. पण त्यामुळे कॅप्टन रोहित शर्मा आणि हेड कोच राहुल द्रविड यांची डोकेदुखी वाढली आहे. पाकिस्तान विरुद्ध पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. पण या मॅचमध्ये विकटेकीपर इशान किशनने 5 व्या नंबरवर येऊन जबरदस्त फलंदाजी केली. त्यामुळे आशिया कपच्या सुपर 4 राऊंडमध्ये पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात केएल राहुलला प्लेइंग इलेव्हनमध्ये कसं बसवायच? हा टीम मॅनेजमेंटसमोर मुख्य प्रश्न आहे.

येत्या 10 सप्टेंबरला टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये सामना होणार आहे. पाकिस्तान विरुद्ध दमदार कामगिरीमुळे इशान किशन टीमचा महत्त्वाचा सदस्य बनला आहे. आशिया कपमध्ये पाकिस्तान विरुद्ध सलामीच्या सामन्यात 25 वर्षीय इशानने 81 चेंडूत 82 धावा फटकावल्या. 66 धावांवर 4 विकेट अशी स्थिती असताना, इशानने टीमचा डाव सावरला. मागच्या 4 वनडे सामन्यात त्याने 4 हाफ सेंच्युरी झळकवल्या आहेत. केएल राहुल एका मोठ्या गॅपनंतर टीम इंडियात कमबॅक करणार आहे. त्यामुळे टीम मॅनेजमेंट विकेटकिपिंगची जबाबदारी इशान किशनवरच देण्याची शक्यता आहे. श्रेयस अय्यरही मोठ्या गॅपनंतर टीम इंडियात परतणार आहे. तो सुद्धा दुखापतग्रस्त होता. आता केएल राहुलला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्यासाठी कदाचित श्रेयसला बाहेर बसवलं जाऊ शकतं.

सुनील गावस्कर यांचं मत काय?

केएल राहुल vs श्रेयस अय्यर यांच्यात कोणाला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान द्यायच, यावर माजी क्रिकेपटू सुनील गावस्कर यांनी सुद्धा आपलं मत व्यक्त केलं. टीम इंडियाला केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्यामध्ये एकाला निवडाव लागेल, असं गावस्कर इंडिया टुडेवर बोलताना म्हणाले. “आशिया कपच्या सुपर 4 मध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यासाठी राहुल आणि श्रेयसमध्ये चुरस असेल. पाकिस्तान विरुद्ध इशानने जबरदस्त खेळ दाखवलाय. राहुल आणि इशान दोघांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केल्यास इशानला विकेटकीपिंगची जबाबदारी द्यावी. कारण राहुल दुखापतीमधून परतला आहे. विकेटकीपिंग करताना त्याला कदाचित त्रास होऊ शकतो”

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.