IND vs PAK | रिझर्व्ह डे च्या दिवशी पण मॅच झाली नाही, तर टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचेल का?

IND vs PAK | आज पण मॅच रद्द झाली, तर पुढे काय?. आशिया कपमध्ये टीम इंडियाचा पाकिस्तान विरुद्धचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. कालच्या मॅचमध्ये सुद्धा पावसाने व्यत्यय आणला. त्यामुळे आता पुढे काय होणार? हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे.

IND vs PAK | रिझर्व्ह डे च्या दिवशी पण मॅच झाली नाही, तर टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचेल का?
ind vs pak Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Sep 11, 2023 | 8:03 AM

कोलंबो : आशिया कप 2023 टुर्नामेंटमध्ये पावसाने बराच त्रास दिलाय. पावसामुळेच 2 सप्टेंबरला भारत-पाकिस्तानमधला सामना रद्द झाला. 10 सप्टेंबरला भारत-पाकिस्तानमध्ये सुपर-4 राऊंडचा सामना होणार होता. कोलंबोमध्ये हा सामना सुरु आहे. या सामन्यावर पावसाच सावट होतं. त्यामुळे एशियन क्रिकेट काऊन्सिलने या सामन्यासाठी रिझर्व्ह डे ठेवला होता. रविवारी पावसाने या मॅचमध्ये व्यत्यय आणला. त्यामुळे मॅच पूर्ण होऊ शकली नाही. आता हा सामना 11 सप्टेंबरला रिझर्व्ह डे च्या दिवशी खेळला जाणार आहे. पण आजही हवामान खराब राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या अडचणी वाढू शकतात. आता रिझर्व्ह डे च्या दिवशी सुद्धा पाऊस झाला, तर टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचणार का? हा प्रश्न निर्माण होतोय.

पाकिस्तानने या मॅचमध्ये टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने शानदार सुरुवात केली. आतापर्यंत 24.1 ओव्हर्समध्ये टीम इंडियाने 2 विकेट गमावून 147 धावा केल्या आहेत. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे मैदान खेळण्यायोग्य स्थितीमध्ये नव्हतं. त्यामुळे आता रिझर्व्ह डे म्हणजे आज हा सामना खेळला जाईल. रिझर्व्ह डेच्या दिवशी सुद्धा सामना झाला नाही, मग टीम इंडियाचा फायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग काय असेल?. असं झाल्यास टीम इंडियाला श्रीलंकेविरुद्ध 12 सप्टेंबरला आणि बांग्लादेश विरुद्ध 15 सप्टेंबरला होणारा सामना जिंकावाचा लागेल. पाकिस्तान विरुद्ध मॅच रद्द झाली, तर दोन्ही टीम्सना एक-एक पॉइंट मिळेल. टीम इंडियाने श्रीलंका आणि बांग्लादेश विरुद्ध सामना जिंकला, तर त्यांचे एकूण 5 पॉइंट होतील. त्यानंतर टीम इंडिया आरामात फायनल खेळू शकेल. पॉइंट्स टेबलमध्ये काय स्थिती आहे?

पाकिस्तान आणि श्रीलंकेने बांग्लादेशला हरवून दोन-दोन गुण मिळवले आहेत. यावेळी दोन्ही टीम्स टीम इंडियाच्या पुढे आहेत. भारत आणि पाकिस्तान सामना रद्द झाला, तर पाकिस्तानला एक पॉइंट मिळेल. दोन सामन्यात त्यांचे तीन पॉइंट होतील. त्यानंतर पाकिस्तानला श्रीलंकेविरुद्ध खेळाव लागेल. ही मॅच जिंकली, तर पाकिस्तानचे 5 पॉइंट होतील. टीम इंडियाने पण आपल्या दोन मॅच जिंकल्या, तर 5 पॉइंट होतील. अशा स्थितीत श्रीलंका आणि बांग्लादेश दोन्ही टीम फायनलच्या शर्यतीतून बाहेर होतील. त्यानंतर टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये फायनलचा सामना रंगेल. आतापर्यंत दोन्ही टीम एकदाही आशिया कपच्या फायनलमध्ये आमने-सामने आलेल्या नाहीत.

'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर.
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग.
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही.
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.