IND vs PAK : कॅप्टनकडे दाद मागायला गेला, पण बाबर आजमनेच त्याच्यावर नाही दाखवला विश्वास VIDEO

IND vs PAK : टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान मॅचमधील घटना. तो बाबर आजमकडे मागणी करत होता. पण बाबर आजमने त्याच ऐकलं नाही. पावसामुळे स्थगित झालेला टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना आज पुन्हा खेळला जाईल.

IND vs PAK : कॅप्टनकडे दाद मागायला गेला, पण बाबर आजमनेच त्याच्यावर नाही दाखवला विश्वास VIDEO
Asia cup 2023 ind vs pak Image Credit source: AFP
Follow us
| Updated on: Sep 11, 2023 | 9:42 AM

कोलंबो : आशिया कप 2023 मध्ये बरोबर आठ दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांचा कहर पहायला मिळाला होता. त्यांनी दिग्गज खेळाडूंनी भरलेल्या टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरला धक्का दिला होता. आशिया कप स्पर्धेत सुपर-4 राऊंडमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यात पुन्हा एकदा पाकिस्तानी वेगवान गोलंदाजाकडून अशीच अपेक्षा होती. पण रविवारी 10 सप्टेंबरला पाकिस्तानी टीमच नाही, तर त्यांचे फॅन्सही हैराण झाले. टीम इंडियाने या मॅचमध्ये जोरदार सुरुवात केली तसच विकेटसाठी पाकिस्तानला चांगलच तरसवलं. या दरम्यान पाकिस्तानी वेगवान गोलंदाज हॅरिस रौफने असं काही केलं की, कॅप्टन बाबर आजमनेच त्याची फिरकी घेतली. कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर रविवारी सुपर-4 राऊंडच्या सामन्यात टीम इंडिया फलंदाजीसाठी मैदानात उतरली.

सामन्याच्या सुरुवातीलाच स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि नसीम शाह विकेट मिळवून देतील अशी अपेक्षा होती. पण यावेळी असं झालं नाही. कॅप्टन रोहित शर्मा आणि शुभमन गिलने त्यांची धुलाई केली. दोघांनी आक्रमक बॅटिंग करताना अर्धशतक झळकवलं. शतकी भागीदारी केली. पाकिस्तानने अथक मेहनतीने अखेर दोघांचे विकेट मिळवले. पाकिस्तानने बऱ्याच प्रतिक्षेनंतर रोहित शर्मा आणि शुभमन गिलचे सलग दोन ओव्हरमध्ये विकेट काढले. त्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल क्रीजवर होते. दोघांपैकी एकाला बाद करुन टीम इंडियाला दबावाखाली आणण्याची पाकिस्तानकडे संधी होती.

पाकिस्तानी कॅप्टनवर याचा काही परिणाम झाला नाही

वेगवान गोलंदाज हॅरिस रौफने 24 व्या ओव्हरमध्ये केएल राहुल विरुद्ध LBW च जोरदार अपील केलं. अंपायरने आऊट दिलं नाही. त्यावेळी रौफ कॅप्टन बाबर आजमकडे वळला व राहुल आऊट असल्याच सांगत होता. कॅप्टनकडे त्याने DRS ची मागणी केली. हॅरिस रौफ रिव्यूसाठी आजमवर दबाव टाकत होता. पण पाकिस्तानी कॅप्टनवर याचा काही परिणाम झाला नाही. बाबर आजम उलट हसत होता. त्याला रौफची मागणी पटत नव्हती. बाबर इशारा करुन सांगत होता की, चेंडू पॅडला नाही, तर थाय पॅडला लागला आहे, जो स्टम्पसपेक्षा वर आहे. चेंडू स्टम्पसच्या वर गेलाय असं आजम सांगत होता. रिव्यू फुकट जाईल असं बाबरच म्हणणं होतं. बाबरने रौफला हेच सांगितलं. बाबर जे सांगता होता, ते बरोबर होतं. कारण चेंडू खरच स्टम्पसच्या वरुन जात होता.

संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.