IND vs PAK : पाकिस्तान विरुद्ध सामना, 1 जागा 3 खेळाडूंमध्ये चुरस
IND vs PAK : पाकिस्तान विरुद्धच्या मॅचआधी टीम इंडियासमोर काही प्रश्न आहेत. आशिया कप 2023 मध्ये भारताचा पुढचा सामना पाकिस्तान विरुद्ध आहे. सुपर 4 मधील ही मॅच आहे.
कोलंबो : टीम इंडियाच प्रॅक्टिस सेशन झालं. त्यातली 45 मिनिट महत्त्वाची ठरणार आहेत. या 45 मिनिटांमुळे बरच काही बदलू शकतं. आशिया कपमध्ये पाकिस्तान विरुद्ध सुपर 4 चा सामना होणार आहे. जे निर्णय घेतले जातील, त्याचा परिणाम एक नाही, 3 खेळाडूंवर होईल. तुम्ही विचार करत असाल, टीम इंडियाच्या प्रॅक्टिस सेशनमधील ही 45 मिनिट इतकी महत्त्वाची का?. ही 45 मिनिट केएल राहुल पूर्णपणे फिट असल्याचा पुरावा आहे. टीम इंडियाच 8 सप्टेंबरला शुक्रवारी पहिलं आऊटडोअर प्रॅक्टिस सेशन झालं. यामध्ये खेळाडूंना चांगली सरावाची संधी मिळाली. प्रॅक्टिस सेशनमध्ये सर्वाधिक नजर केएल राहुलवर होती. केएल राहुल आशिया कपच्या पहिल्या दोन सामन्यात खेळला नाही. केएल राहुल किती फिट आहे? ते या 45 मिनिटांच्या सेशनमधून दिसलं. प्रॅक्टिस सेशनमध्ये बॅटिंग केल्यानंतर त्याने 45 मिनिट विकेटपाठी यष्टीरक्षणाचा सराव केला.
केएल राहुलच्या फिटनेसबद्दल अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह होतं. कारण मोठ्या ब्रेकनंतर तो खेळत होता. 45 मिनिटांच्या प्रॅक्टिसमधून त्याने आपल्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं. विकेटकिपिंग करुन राहुलने आपली उपयुक्तता सिद्ध केलीय. राहुलने एक प्रश्न मिटवला असला, तरी दुसरे अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. राहुल पाकिस्तान विरुद्ध किपिंग करणार असेल, तर भारताची प्लेइंग इलेव्हन काय असेल? राहुलला कोणाच्या जागी संधी मिळणार? राहुल इशानची जागा घेणार की, दोघे एकत्र खेळताना दिसतील. असं होणार असेल, तर मग श्रेयस अय्यरच काय? असा प्रश्न निर्माण होतो. नंबर 4 वर अय्यर Vs राहुल?
इशानच्या कामगिरीत सातत्य आहे, त्यामुळे त्याच खेळणं निश्चित आहे. मागच्या 4 डावात त्याने 50 प्लसपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. पल्लेकेलेमध्ये पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया संकटात होती. त्यावेळी इशानने 5 व्या नंबरवर येऊन 82 धावा केल्या. दुसरीकडे टीम इंडियासमोर चौथ्या क्रमांकाची समस्या आहे. श्रेयस अय्यर या स्थानासाठी चांगला पर्याय आहे. अय्यरने चौथ्या नंबरवर 21 इनिग खेळल्या आहेत. यात त्याने 45.50 च्या सरासरीने 819 धावा केल्या आहेत. केएल राहुल टीम इंडियासाठी 4 थ्या नंबरवर 7 वनडे इनिंग खेळलाय. यात त्याची सरासरी 40.17 आहे.