Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs BAN | फायनलआधी बांग्लादेश बिघडवू शकते टीम इंडियाचा खेळ

IND vs BAN Asia cup 2023 : टीम इंडियाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. विजेतेपदाच्या सामन्याआधी आज होणारी मॅच टीम इंडियासाठी महत्त्वाची आहे. फायनलआधी आजचा सामनाही टीम इंडियासाठी तितकाच महत्त्वाचा का आहे? जाणून घ्या.

IND vs BAN | फायनलआधी बांग्लादेश बिघडवू शकते टीम इंडियाचा खेळ
Team India Image Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Sep 15, 2023 | 8:01 AM

कोलंबो : टीम इंडियाने आशिया कप 2023 च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. शुक्रवारी कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर टीम इंडियाचा बांग्लादेश विरुद्ध सामना होणार आहे. सुपर-4 फेरीतला हा शेवटचा सामना आहे. बांग्लादेशची टीम फायनलच्या शर्यतीतून आधीच बाद झाली आहे. पण टीम इंडियाला फायनलआधी आजच्या सामन्यात बांग्लादेशला कमी लेखण्याची चूक महाग पडू शकते. यामुळे टीम इंडियाची विजयाची लय बिघडू शकते. बांग्लादेशमध्ये टीम इंडियाला हरवण्याची क्षमता आहे. असं झाल्यास फायनलआधी रोहित शर्माच्या टीमची लय बिघडू शकते. कॅप्टन रोहित शर्मा समोर सुद्धा प्रश्न असेल, की सध्याची विनिंग प्लेइंग इलेव्हन कायम ठेवायची की, आतापर्यंत टुर्नामेंटमध्ये न खेळलेल्या खेळाडूंना संधी द्यायची. टीममध्ये काही बदल होऊ शकतात, असे संकेत गोलंदाजी कोच पारस महाम्ब्रे यांनी दिले आहेत.

टीम इंडियामध्ये दोन खेळाडूंची एन्ट्री पक्की मानली जात आहे. श्रेयस अय्यर पूर्णपणे फिट आहे. नेट्समध्ये त्याने फलंदाजीसोबत गोलंदाजीचा सुद्धा सराव केला. त्याचं खेळणं निश्चित मानलं जात आहे. मोहम्मद सिराजच्या जागी मोहम्मद शमीला टीममध्ये स्थान मिळू शकतं. या दोन बदलांमुळे टीम इंडियावर जास्त परिणाम होणार नाही. दोन्ही खेळाडूंना वर्ल्ड कपआधी मॅचमध्ये खेळण्याची सुद्धा संधी मिळेल. अय्यरचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केल्यास इशान किशनला बाहेर बसवलं जाऊ शकतं. फायनलआधी आपली विजयी लय कायम ठेवण्याच्या दृष्टीने टीम इंडियासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. वर्ल्ड कपआधी काही खेळाडूंना मॅच टाइम मिळेल, ते सुद्धा तितकच महत्त्वाच आहे.

दोघांनी जास्तीत जास्त खेळणं टीम इंडियासाठी महत्त्वाच

केएल राहुल सुरुवातीच्या दोन सामन्यात खेळला नव्हता. पुनरागमन करताना त्याने पाकिस्तान विरुद्ध दमदार शतक ठोकलं. श्रीलंकेविरुद्ध चांगल्या सुरुवातीला मोठ्या इनिंगमध्ये बदलता आलं नाही. राहुल दुखापतीमुळे बरेच महिने टीमच्या बाहेर होता. मोठ्या ब्रेकनंतर परतल्यामुळे राहुलला जितके सामने खेळण्याची संधी मिळेल, ते टीमसाठी चांगलं आहे. जसप्रीत बुमराहची सुद्धा हीच स्थिती आहे. बुमराहने एक वर्षानंतर टीममध्ये पुनरागमन केलय. आशिया कपमध्ये बुमराह आतापर्यंत दोन सामने खेळलाय. वर्ल्ड कप आधी त्याने सुद्धा जास्तीत जास्त सामने खेळणं महत्त्वाच आहे.

भारत : रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पंड्या (उप कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

बांग्लादेश : शाकिब अल हसन (कॅप्टन), अनामुल हक बिजॉय, नजमुह हसन शांतो, तौहिद हृदय, अफीफ हुसैन ध्रुबो, मेहदी हसन मिराज, तास्किन अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शोरीफुल इस्लाम, नासुम अहमद, शाक मेहदी हसन, नईम शेख, शमीम हुसैन, तंजिद हसन तमीम, तंजिम हसन साकिब.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.