Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK | ‘कधीही बाजी पलटू शकतात’, Virat Kohli पाकिस्तानच्या कुठल्या खेळाडूंबद्दल हे म्हणाला?

IND vs PAK | नेहमीच पाकिस्तानसाठी कर्दनकाळ ठरणाऱ्या विराट कोहलीने काय म्हटलय?. आशिया कप स्पर्धा सुरु झाली आहे. उद्या भारत आणि पाकिस्तानची टीम आमने-सामने येणार आहे. तटस्थ ठिकाणी म्हणजे श्रीलंकेत हा सामना रंगणार आहे.

IND vs PAK | 'कधीही बाजी पलटू शकतात', Virat Kohli पाकिस्तानच्या कुठल्या खेळाडूंबद्दल हे म्हणाला?
Asia cup 2023 Virat KohliImage Credit source: pti
Follow us
| Updated on: Sep 01, 2023 | 9:43 AM

नवी दिल्ली : आशिया कप स्पर्धेत भारत-पाकिस्तानमध्ये टक्कर होणार आहे. उद्या 2 सप्टेंबरला ही मॅच होईल. या सामन्याबद्दल जगभरातील क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुक्ता आहे. श्रीलंकेच्या कँडी येथील मैदानात जागतिक क्रिकेटमधील या दोन बलवान संघांमध्ये सामना होईल. पुढच्या अडीच महिन्यात भारत-पाकिस्तानचे संघ तीनवेळा आमने-सामने येणार आहेत. त्याची सुरुवात उद्यापासून होणार आहे. सगळेच या सामन्याबद्दल उत्सुक आहेत. पाकिस्तानच्या घातक वेगवान गोलंदाजीचा दिग्गज फलंदाजांनी भरलेली भारतीय टीम कसा सामना करते? हे सगळ्यांना पहायच आहे. माजी कर्णधार आणि अव्वल फलंदाज विराट कोहलीवर बरच काही अवलंबून असेल. हे इतकं सोप सुद्धा नसेल.

पाकिस्तानच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी भारतीय फलंदाजांना आपलं बेस्ट प्रदर्शन कराव लागेल. पाकिस्तान विरुद्ध जेव्हा कधी सामना होतो, तेव्हा टीम इंडियाकडून विराट कोहलीने सर्वोत्तम प्रदर्शन केलय. तो यशस्वी फलंदाज ठरलाय. पाकिस्तानच्या वेगवेगळ्या गोलंदाजांविरुद्ध विराट कोहलीने मागच्या 10-12 वर्षात भरपूर धावा केल्या आहेत. फॉर्मेट कुठलाही असो, आशिया कप किंवा वर्ल्ड कप पाकिस्तान विरुद्ध विराट कोहलीची बॅट नेहमीच चाललीय. यावेळी सुद्धा टीम इंडियाला आपल्या स्टार फलंदाजांकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे.

विराट कोहली काय म्हणाला?

भारतीय फलंदाजांसाठी मार्ग सोपा नसेल. शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह आणि हॅरिस रौफ यांची पेस बॉलिंग त्याचवेळी शादाब खानच्या रुपात क्वालिटी लेग स्पिन भारताला अडचणीत आणू शकतात. माजी कर्णधार कोहलीला सुद्धा याची कल्पना आहे. स्टार स्पोर्ट्सवर बोलताना विराट कोहली म्हणाला की, “पाकिस्तानी गोलंदाजांचा सामना करणं इतकं सोप नसेल. गोलंदाजी ही पाकिस्तानची मुख्य ताकत आहे. ते कधीही सामन्याची दिशा पलटू शकतात. त्यामुळे फलंदाजांनी आपलं सर्व श्रेष्ठ प्रदर्शन करणं आवश्यक आहे” पाकिस्तान विरुद्ध विराटच्या प्रदर्शनावर एकदा नजर मारा

पाकिस्तान विरुद्ध विराट कोहलीची कामगिरी नेहमीच अव्वल राहिली आहे. त्याने 13 वनडे सामन्यात 48.72 च्या सरासरीने 536 धावा केल्या आहेत. यात दोन शतकं आहेत. पाकिस्तान विरुद्ध विराटने आशिया कपमध्येच 11 वर्षापूर्वी सेंच्युरी झळकवली होती. त्यावेळी त्याने 183 धावांची सुपर इनिंग खेळून टीमला विजय मिळवून दिला होता.

पंतप्रधान मोदींचं अवतार कार्य संपलं आहे..; संजय राऊतांची प्रतिक्रिया
पंतप्रधान मोदींचं अवतार कार्य संपलं आहे..; संजय राऊतांची प्रतिक्रिया.
VIDEO: 'तेल लगाने गया...', L&T च्या सुरक्षा रक्षकाला मनसैनिकांचा हिसका
VIDEO: 'तेल लगाने गया...', L&T च्या सुरक्षा रक्षकाला मनसैनिकांचा हिसका.
धस खोक्याचे आका...त्यांना हिरो व्हायचंय, तृप्ती देसाईंचा धसांवर निशाणा
धस खोक्याचे आका...त्यांना हिरो व्हायचंय, तृप्ती देसाईंचा धसांवर निशाणा.
धसांच्या गंभीर आरोपांवर दमानिया म्हणाल्या, बुद्धीला हे न पटण्यासारखं..
धसांच्या गंभीर आरोपांवर दमानिया म्हणाल्या, बुद्धीला हे न पटण्यासारखं...
'माझ्या खुनाचा कट अन् मला व्हिलन ठरवून...', धसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
'माझ्या खुनाचा कट अन् मला व्हिलन ठरवून...', धसांचा खळबळजनक गौप्यस्फोट.
राज ठाकरेंच्या पुढील राजकीय वाटचालीचं मनसेचं 'इंजिन' कोणत्या दिशेनं?
राज ठाकरेंच्या पुढील राजकीय वाटचालीचं मनसेचं 'इंजिन' कोणत्या दिशेनं?.
वाल्मिक कराडला कोणी चोपलं? बीडच्या जेलमध्ये तुफान राडा, घडलं काय?
वाल्मिक कराडला कोणी चोपलं? बीडच्या जेलमध्ये तुफान राडा, घडलं काय?.
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.