PAK vs SL : श्रीलंकेकडून पराभव सहन नाही झाला, हरल्यानंतर ‘हा’ पाकिस्तानी प्लेयर खूप रडला, VIDEO

PAK vs SL : श्रीलंकेने स्वप्नांवर पाणी फिरवल्यानंतर रडणारा हा पाकिस्तानी प्लेयर कोण आहे?. लास्ट ओव्हरमध्ये श्रीलंकेला विजयासाठी 8 धावांची आवश्यकता होती. त्याची ही डेब्यु मॅचच होती.

PAK vs SL : श्रीलंकेकडून पराभव सहन नाही झाला, हरल्यानंतर 'हा' पाकिस्तानी प्लेयर खूप रडला, VIDEO
Asia cup 2023 pak vs sl
Follow us
| Updated on: Sep 15, 2023 | 1:31 PM

कोलंबो : पाकिस्तानच आशिया कप जिंकण्याच स्वप्न भंग पावलं आहे. पुन्हा एकदा पाकिस्तानी टीम या टुर्नामेंटच्या फायनलमध्ये पोहोचू शकलेली नाही. गुरुवारी श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये सामना झाला. रोमांचक सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानवर 2 विकेट राखून विजय मिळवला. फायनलमध्ये श्रीलंकेचा सामना भारताविरुद्ध होणार आहे. आपण हरलो, यावर पाकिस्तानी टीमला विश्वास बसत नव्हता. पाकिस्तानचे सर्व खेळाडू दु:खी होते. बाबर आजमच्या नेतृत्वाखाली या टीममधील एक प्लेयर हरल्यानंतर भरपूर रडला. या खेळाडूच नाव जमन खान आहे. जमन खानने कालच श्रीलंकेविरुद्ध सामन्यात वनडे डेब्यु केला. पावसामुळे सामना उशिराने सुरु झाला होता. त्यामुळे 50 ऐवजी 45 ओव्हर्सचा सामना खेळवण्यात आला. पाकिस्तानने पहिली बॅटिंग केली. पण पाऊस आला. त्यानंतर अंपायर्सनी 42-42 ओव्हर्सचा सामना केला. पाकिस्तानने 252 धावा केल्या.

श्रीलंकेला विजयासाठी 253 धावांच टार्गेट मिळालं होतं. डकवर्थ लुइस नियमानुसार, पाकिस्तानच्या खात्यात एक रन्स कमी करण्यात आला. पाकिस्तानने जितक्या धावा केल्या होत्या, तितकच टार्गेट श्रीलंकेला मिळालं. लास्ट ओव्हरमध्ये श्रीलंकेला विजयासाठी 8 धावांची आवश्यकता होती. जमन खान पाकिस्तानकडून लास्ट ओव्हर टाकत होता. त्याने चांगली सुरुवात केली होती. पाकिस्तानला तो विजय मिळवून देईल असं वाटत होतं. पाचव्या चेंडूवर चरिता असलंकाने चौकार मारला. सामना तिथेच पाकिस्तानच्या हातून निसटला व श्रीलंका विजयी ठरली. असलंकाने शेवटच्या चेंडूंवर दोन धावा घेऊन आपल्या टीमला विजय मिळवून दिला. त्याच्या डोळ्यात पाणी होतं

श्रीलंकेच्या विजयानंतर जमन खान खूप निराश झाला. तो मैदानातच बसला. आपलं डोकं जमिनीवर टेकलं. त्याचे डोळे पाणावले होते. तो उभा राहिला त्यावेळी त्याच्या डोळ्यात पाणी होतं. शाहीन शाह आफ्रिदीने त्याला मिठी मारली व शांत करण्याचा प्रयत्न केला. जमनने या सामन्यात 6 ओव्हर गोलंदाजी करताना 39 धावा केल्या. पण तो एकही विकेट घेऊ शकला नाही. पाकिस्तानची टीम मागच्या 11 वर्षापासून आशिया कपचा किताब जिंकलेला नाही. पाकिस्तानने 2012 मध्ये शेवटचा आशिया कप जिंकला होता.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.