IND vs PAK सामन्यात रिझर्व्ह डे च सत्य काय? बांग्लादेश-श्रीलंकेचे कोच एक बाोलतात आणि बोर्ड वेगळं
IND vs PAK | नेमकं कोणाच खरं मानायचं?. एक प्रकारे हा अन्यायकारक निर्णय आहे. फॅन्स आणि मीडियाने सुद्धा प्रश्न उपस्थित केले आहेत. भारत-पाकिस्तानमध्ये येत्या 10 सप्टेंबरला सामना होणार आहे.
कोलंबो : यंदाच्या आशिया कप 2023 स्पर्धेत काही मुद्यांवरुन वाद निर्माण झाले आहेत. आधी स्पर्धेच यजमानपद, त्यानंतर वेन्यू बदलण्यावरुन वाद सुरु आहे. आता त्यात आणखी एका नवीन मुद्याची भर पडली आहे. कोलंबोमध्ये सुपर-4 राऊंडच्या सामन्यांना पावसापासून धोका आहे. त्यात एशियन क्रिकेच काऊन्सिलने अचानक फक्त भारत-पाकिस्तान सामन्यासाठी रिझर्व्ह डे ची घोषणा केली आहे. त्यावरुन आता वाद सुरु झाला आहे. सुपर-4 च्या अन्य सामन्यांसाठी अशी व्यवस्था नाहीय. त्यामुळे मीडिया, फॅन्सनी हा निर्णय चुकीचा असल्याच म्हटलं आहे. आता या वादावर बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने स्पष्टीकरण दिलं आहे. पण त्यातून अनेक नवीन प्रश्न निर्माण होतात. कोलंबो येथे भारत-पाकिस्तानमध्ये 10 सप्टेंबरला होणाऱ्या सामन्यासाठी रिझर्व्ह डे ठेवण्यात आल्याची घोषणा ACC ने शुक्रवारी केली.
म्हणजे 10 सप्टेंबरला होणारा सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही, तरी ही मॅच 11 सप्टेंबरला खेळवली जाईल. आतापर्यंत फक्त 17 सप्टेंबरला होणाऱ्या फायनलसाठी ही व्यवस्था होती. पण कोलंबोमध्ये सतत पाऊस सुरु आहे, पावसामुळे अडथळा येऊ शकतो, ही शक्यता लक्षात घेऊ ACC ने हा निर्णय घेतलाय. या निर्णयाने अनेक जण हैराण झाले आहेत. कारण कोलंबोमध्ये फक्त भारत-पाकिस्तान नाही, बांग्लादेश-श्रीलंकेच्या टीम सुद्धा भिडणार आहेत. पण या सामन्यासाठी अशी व्यवस्था नाहीय. फक्त एका मॅचसाठी अशा प्रकारे नियम बदलणं हे धक्कादायक आहे. असा निर्णय घेताना, श्रीलंका आणि बांग्लादेश तुम्ही विचारलत का ? असा प्रश्न आता विचारला जातोय.
बांग्लादेश-श्रीलंका बोर्डाने काय म्हटलय?
या मुद्यावरुन उलट-सुलट चर्चा सुरु झाल्यानंतर बांग्लादेश आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाने टि्वट करुन यावर स्पष्टीकरण दिलय. बांग्लादेश बोर्डाने शुक्रवारी रात्री एक टि्वट केलं. ACC च्या टेक्निकल समितीने हा निर्णय घेतल्याच त्यांनी सांगितलं. सुपर-4 मध्ये सहभागी होणाऱ्या चार टीम्स आणि ACC ने सर्व सहमतीने हा निर्णय घेतला आहे. श्रीलंकन क्रिकेट बोर्डानेही हेच म्हटलय. सहतमीनंतरच भारत-पाक सामन्यासाठी रिझर्व्ड डे ठेवण्यात आला आहे. कोचेसच म्हणणं वेगळं
दोन्ही देशाच्या बोर्डाने हे म्हटलय. त्यामुळे हे अधिकृत वक्तव्य मानल जातय. शनिवारी श्रीलंका आणि बांग्लादेशमध्ये सामना होतोय. त्याआधी प्रेस कॉन्फरन्समध्ये दोन्ही टीम्सच्या कोचेसेनी या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. आम्हाला सुद्धा रिझर्व्ह डे हवा होता, असं बांग्लादेश टीमचे कोच चंदिका हतुरुसिंघा म्हणाले. श्रीलंकेचे कोच क्रिस सिल्वरवुड सरळ म्हणाले, हा तर अन्याय आहे.