Shahid Afridi : शाहीद आफ्रिदी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करणार का?
Shahid Afridi : शाहीद आफ्रिदी पुढाकार घेणार असून तो मोदींना विनंती करणार आहे. स्वत: शाहीद आफ्रिदीने हे म्हटलय. दोहा येथे लिजेंडस लीग क्रिकेट टुर्नामेंट सुरु होती. तिथे बोलताना शाहीद आफ्रिदीने ही माहिती दिलीय.
Asia cup 2023 : आशिया कप टुर्नामेंटच्या आयोजनावरुन नाट्य रंगलं आहे. यंदाची आशिया कप स्पर्धा वनडे फॉर्मेटमध्ये होणार आहे. पाकिस्तानात आशिया कप आयोजनाचा कार्यक्रम होता. पण भारताने पाकिस्तानात येऊन खेळण्यास नकार दिला आहे, त्यामुळे आशिया कप आयोजनाच ठिकाण बदललं जाणार हे निश्चित आहे. पण आशिया कप स्पर्धा कुठे होणार? ते अजून नश्चित झालेलं नाही. बीसीसीआय आणि पीसीबीमध्ये यावरुन वाद रंगला आहे.
टीम इंडिया आशिया कपसाठी पाकिस्तानात येणार नसेल, तर आम्ही सुद्धा वनडे वर्ल्ड कपसाठी भारतात येणार नाही, अशी पाकिस्तानने भूमिका घेतली आहे. आशिया कप टुर्नामेंटवरुन दोन्ही देशांचे क्रिकेट बोर्ड आमने-सामने आहेत. त्यावरुन नाटय रंगलेलं आहे. आता यामध्ये पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीने उडी घेतली आहे.
शाहीद आफ्रिदीने काय म्हटलय?
भारत-पाकिस्तानमध्ये क्रिकेट संबंध सुरळीत व्हावेत, यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करणार आहोत, असं शाहीद आफ्रिदीने म्हटलय. भारताकडे मजबूत क्रिकेट बोर्ड आहे. बीसीसीआयने जबाबदारी स्वीकारुन दोन्ही देशांमधील क्रिकेट संबंध सामान्य होण्यासाठी प्रयत्न करावेत, असं आफ्रिदीने म्हटलय.
आफ्रिदी हे कुठे म्हणाला?
“दोन्ही देशामध्ये क्रिकेट सुरु व्हावं, यासाठी मी मोदी साहेबांना विनंती करेन” असं लिजेंडस लीग क्रिकेट खेळायला आलेले शाहीद आफ्रिदी म्हणाला. कतारमध्ये ही स्पर्धा सुरु आहे. पीसीबी कमकुवत आहे का?
पीसीबी कमकुवत आहे का? असा प्रश्न शाहीद आफ्रिदीला विचारला, त्यावर त्याने “मी कमकुवत म्हणणार नाही. पण बीसीसीआयकडून काही उत्तर मिळाली पाहिजेत” असं सांगितलं. पाकिस्तानात आता सुरक्षेचा मुद्दा राहिलेला नाही. अनेक परदेशी टीम्सनी पाकिस्तानचा दौरा केलाय, असं आफ्रिदी म्हणाला. दोन्ही देशाच्या सरकारांनी परवानगी दिली, तर भारत-पाकिस्तान सीरीज होऊ शकते, असं आफ्रिदीला वाटतं.